रोहिंग्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहिंग्या
Flag of the Rohingya Nation
रोहिंग्या ध्वज
एकूण लोकसंख्या

१,४२४,०००

लोकसंख्येचे प्रदेश
म्यानमार (आरकान), बांग्लादेश, मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, थायलंड, भारत
म्यानमार ध्वज म्यानमार ८००,००० [१][२]
Flag of Bangladesh.svg बांग्लादेश ३००,००० [३]
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान २००,००० [४][५][६]
थायलंड ध्वज थायलंड १००,००० [७]
मलेशिया ध्वज मलेशिया २४,००० [८]
भाषा
रोहिंग्या भाषा
धर्म
इस्लाम


रोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार, म्यानमारमध्ये ८००,००० रोहिंग्या लोक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निरिक्षणात रोहिंग्या समाज हा जगातील सर्वात पीडित समाज आहे.[९] अनेक रोहिंग्या हे शेजारी बांग्लादेश आणि थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागातील अनिवासी कँपमध्ये राहत आहेत.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

रोहिंग्या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक विचार प्रवाह आहेत. रोहिंग्या इतिहासकार खलिलूर रहमान यांच्या मते अरबी शब्द 'रहम' म्हणजे 'दया' या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. इ.स.६ व्या शतकात अरबी व्यापारी प्रवास करत असताना रामरी बेटाजवळ जहाज बुडू लागले. व्यापारी जीव वाचवण्यासाठी नजिकच्या बेटावर उतरले आणि तेथील राजाच्या हाती लागले. राजाने व्यापाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली आणि व्यापारी 'रहम','रहम' असा घोष करू लागले. त्याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन 'रोहांग' आणि पुढे 'रोहिंग्या' हा शब्द कायम झाला. आरकान मुस्लिम संघटनेचे सदस्य जहीरूद्दिन अहमद आणि नाझिर अहमद यांच्या मते त्या व्यापारी मुसलमानांना 'थंबू क्या' समाजाच्या नावाने ओळखले जाते. रोहिंग्या समाजाचे मुळ हे अफगाणिस्तानमधील रुहा समाजात असल्याचे त्यांचे मत आहे. इतिहासकार एम. ए. चौधरी यांच्या मते 'म्रोहाँग' राजवटीच्या नावावरून 'रोहिंग्या' हा शब्द निर्माण झाला.

संदर्भ[संपादन]

  1. July 2012|date=June 15, 2012|agency=[Inter Press Service Ethnic Cleansing of Muslim Minority in Myanmar?]
  2. 729,000 (United Nations estimate 2009)
  3. Template error: argument शीर्षक is required. 
  4. कराचीतील बेघर - Outlook India
  5. SRI On-Site Action Alert: Rohingya Refugees of Burma and UNHCR’s repatriation program - Burma Library
  6. From South to South: Refugees as Migrants: The Rohingya in Pakistan
  7. Template error: argument शीर्षक is required. 
  8. Template error: argument शीर्षक is required. 
  9. Template error: argument शीर्षक is required. 

बाह्य दुवे[संपादन]