भारतीय योगशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय योग शास्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय योगशास्त्रा मध्ये योगाचे पाच प्रकार सांगितले आहेत.

  • ज्ञानयोग -- आत्मज्ञान
  • हठयोग -- आसन आणि कुंडलिनी जागृति
  • कर्मयोग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)
  • भक्तियोग -- भजनं कुर्याम्
  • राजयोग -- योगः चित्तवृत्तिनिरोधः (मनाच्या की वृत्तींवर नियंत्रण ठेचणे हाच योग आहे)

पतंजलींनी योगाचा अर्थ चित्ताच्या वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) असा सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ भाग अथवा अंगे आहेत. ती खालील प्रमाणे आहेत:-

  • यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
  • नियम (स्वाध्याय, सन्तोष, तप, पवित्रता, आणि ईश्वर यांच्याप्रती चिन्तन) बाहेरचे अंग
  • योगासन बाहेरचे अंग
  • प्रणाय़ाम बाहेरचे अंग
  • प्रत्याहार बाहेरचे अंग
  • धारणा आतले/मानसिक अंग
  • ध्यान आतले/मानसिक अंग
  • समाधि आतले/मानसिक अंग

योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे - योग हा देह आणि चित्त यांची ओढाताणीमध्ये मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्मदर्शना पासून वंचित रहाण्यापासून वाचवतो. • चित्तवृत्तींचा निरोध (दमनाने)नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे हा होय. • योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे हा होय. • याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमद्ध्ये - महाभारत, उपनिषदे, पतञ्जलींचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका यांमध्ये मिळतात.