मोझेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मायकेल अॅँजेलो याने घडवलेले मोझेसचे शिल्प
मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- मोझेसविषयी ज्ञानकोशीय लेख. ज्युइश एन्सायक्लोपीडिया.कॉम. (इंग्लिश मजकूर)