पी.सी. अलेक्झांडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर
जन्म मार्च २०, इ.स. १९२१
केरळ
मृत्यू ऑगस्ट ११, इ.स. २०११
मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटल, चेन्नई
मृत्यूचे कारण कर्करोग
चिरविश्रांतिस्थान सेंट मेरी ऑर्थोडॉक्स चर्च, मेवलीकारा, अलेप्पी जिल्हा, केरळ
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा प्रशासनिक सेवा, राज्यपाल
पदवी हुद्दा तमिळनाडू राज्यपाल, महाराष्ट्र राज्यपाल
कार्यकाळ १९८८ - १९९०, १२ जानेवारी १९९३ ते १३ जुलै २००२,
धर्म ख्रिश्चन
अपत्ये २ मुली, २ मुले

डॉ. पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर (मल्याळम: പി.സി. അലക്സാണ്ടർ ; रोमन लिपी: Padinjarethalakal Cherian Alexander ;), अर्थात पी.सी. अलेक्झांडर (रोमन लिपी: P.C. Alexander ;), (२० मार्च, इ.स. १९२१ - १० ऑगस्ट, इ.स. २०११) हे भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात तमिळनाडूचे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचीही धुरा वाहिली. २९ जुलै, इ.स. २००२ ते २ एप्रिल, इ.स. २००८ या काळात त्यांनी भारताच्या राज्यसभेत अपक्ष राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

कारकीर्द[संपादन]

सनदी अधिकारी[संपादन]

पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू वर्तुळातील होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने अलेक्झांडरांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, राजीव गांधी यांनीही आपले प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली होती.

राज्यपाल[संपादन]

पुढे राजीव गांधींनी अलेक्झांडरांना इंग्लंडमध्ये उच्चायुक्त म्हणून पाठवले. इ.स. १९८८ मध्ये तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालावधीत त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर, इ.स.१९९३ मध्ये, नरसिंह राव पंतप्रधान असताना ते राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात दाखल झाले आणि इ.स. २००२ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. अलेक्झांडरांनी १२ जानेवारी इ.स.१९९३ ते १३ जुलै इ.स. २००२ या दीर्घ कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली; ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले राज्यपाल आहेत, याशिवाय त्यांनी तामिळनाडू, तसेच गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. राज्याच्या मागास भागातील अनुशेष दूर करण्यासाठी अलेक्झांडर यांनी प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. "उच्च प्रतीचा अभ्यासू प्रशासक' अशी त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा होती. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त आणि जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे सहायक महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव असणाऱ्या अलेक्झांडरांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

राज्यसभा सदस्य[संपादन]

इ.स. २००७ मध्ये राष्ट्रपतीपदासाठीही पीसींचे नाव चर्चेत होते, पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शले. नाही. अपक्ष उमेदवार म्हणून जुलै २९ इ.स. २००२ ते एप्रिल २ इ.स. २००८ पर्यंत राज्यसभेचे खासदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. इ.स. २००७च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव काही काळ चर्चेत होते.

साहित्यिक लेखन[संपादन]

त्यांनी ‘थ्रू द कॉरिडोअर्स ऑफ पावर’ हे आत्मचरित्र लिहले.. माय इअर विथ इंदिरा गांधी, इंडिया इन द न्यू मिलेनिअम, असे काही पुस्तकंही लिहिली.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-06-15. 2011-08-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)