नायगारा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| नायगारा नदी | |
नायगारा नदीचे उपग्रहामधून घेतलेले चित्र |
|
| उगम | ईरी सरोवर |
| मुख | ऑन्टारियो सरोवर |
| लांबी | ५८ किमी (३६ मैल) कि.मी. |
| सरासरी प्रवाह | ५,७९६ मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | ४,३५,१२३ किमी² |
नायगारा नदी (इंग्रजी: Niagara River) ही उत्तर अमेरिकेतील ईरी व ऑन्टारियो ह्या दोन भव्य सरोवरांना जोडणारी ५८ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाचा ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा ह्याच नदीवर आहे.
जलविद्युतनिर्मितीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
[संपादन] मोठी शहरे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |