धर्मानंद दामोदर कोसंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धर्मानंद कोसंबी
जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७६
मृत्यू ४ जून, १९४७ (वय ७०)
सेवाग्राम, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र समाजशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
विषय बौद्ध तत्त्वज्ञान, पाली भाषा
अपत्ये दामोदर धर्मानंद कोसंबी

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचेपाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी [१]हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.[२]

जन्म[संपादन]

धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला.[३] गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती.

कार्य[संपादन]

ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वीही प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते, हे होय. अद्‍भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मुळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषतः धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून काढण्याचा प्रयत्‍न केला.

प्रकाशित साहित्य[संपादन]

पुस्तकाचे शीर्षक वर्ष (इ.स.) भाषा विषय/वर्णन
जातककथा अनेक भाग मराठी बुद्धकथा
निवेदन मराठी आत्मचरित्र
भगवान बुद्ध इ.स. १९४० मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित)
बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
बोधि-सत्त्व (नाटक) मराठी
नाटक
विसुद्दीमग्ग पाली
पाली ग्रंथ

चरित्रे[संपादन]

  • संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी (अशोक चौसाळकर)


बाह्य दुवे[संपादन]

धर्मानंद कोसंबी ह्यांच्या समग्र साहित्याचे संकेतस्थळ


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डिंगणकर, डॉ मधुसूदन वि (२१ एप्रिल २०१६). भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी. नागपूर, महाराष्ट्र: नचिकेत प्रकाशन.
  2. ^ Kosambi, Dharmanand (1976). Dharamananda : acarya Dharamanand Kosambi atmacaritra ani caritra. Gova Hind Asosieshan.
  3. ^ "धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र" (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)