दामोदर धर्मानंद कोसंबी
| दामोदर धर्मानंद कोसंबी | |
| पूर्ण नाव | दामोदर धर्मानंद कोसंबी |
| जन्म | ३१ जुलै, इ.स. १९०७ |
| मृत्यू | २९ जून, इ.स. १९६६ पुणे, महाराष्ट्र |
| कार्यक्षेत्र | गणितज्ञ, इतिहाससंशोधक |
| राष्ट्रीयत्व | मराठा, भारतीय |
| भाषा | मराठी(मातृभाषा) इंग्लिश (साहित्य) |
| विषय | गणित, इतिहास, अर्थशास्त्र |
| वडील | धर्मानंद दामोदर कोसंबी |
दामोदर धर्मानंद कोसंबी (३१ जुलै, इ.स. १९०७ - २९ जून, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी गणितज्ञ व इतिहाससंशोधक होते. यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला [१]. बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक धर्मानंद दामोदर कोसंबी हे यांचे वडील होत.
अनुक्रमणिका |
योगदान[संपादन]
दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या अॅन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तुहरीचा शिलालेख आणि अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. ज्योतिष, खगोल आणि नाणकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते. सिंधुची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत-रोमन व्यापार, आर्यांचा विस्तार, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती याविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले [२].
प्रकाशित साहित्य[संपादन]
| पुस्तकाचे शीर्षक | वर्ष (इ.स.) | भाषा | विषय/वर्णन |
|---|---|---|---|
| मिथ अॅंड रिअॅलिटी: स्टडीज इन द फॉर्म्युलेशन ऑफ इंडियन कल्चर | इ.स. १९६२ | इंग्लिश | भारतीय संस्कृती-समाजशास्त्रविषयक ग्रंथ |
| द कल्चर अॅन्ड सिविलायझेशन ऑफ एंशंट इंडिया | इ.स. १९६५ | इंग्लिश | भारतीय संस्कृती-समाजशास्त्रविषयक ग्रंथ |
| एक्स्पेक्टिंग एजिज इन द डायलेक्टीकल मेथड | इंग्लिश | ||
| स्टॅटीस्टिकल स्टडी ऑफ द ओल्ड इंडियन पंचमार्क्ड कॉईन्स | इंग्लिश | ||
| इंडो-युरोपियन पीपल | इंग्लिश | ||
| टेक्स्टाईल गुड्स इन इंडिया | इंग्लिश |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ इनसायक्लोपीडिया ऑफ मार्क्सिझम. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ↑ डि.डि. कोसंबी ब्लॉग. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे[संपादन]
- फ्रंटलाईन: द मेकींग ऑफ अॅन इंडॉलॉजिस्ट. (इंग्रजी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |