तंजावर मराठी
तंजावर मराठी ( तमिळ: தஞ்சாவூர் மராத்தி (लिप्यंतरः तंजावूर मरात्ति); रोमन लिपी: Thanjavur Marathi / Tanjore Marathi ) ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाते. जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. शिवाजीचे बंधू मराठा राजे व्यंकोजी ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव ह्या भाषेवर जाणवतो.
भाषाप्रयोग [संपादन]
उदाहरणासाठी काही वाक्यप्रयोगः
नमश्कार - नमस्कार
कशा आहेत - कसे आहात?
मी बेश आहे - मी छान आहे.
तुमचं नाव काय्?- तुमचं नाव काय्?
माजं नाव...-माझं नाव
तुमी कोण्? - तुम्ही कोण?
होये - होय
बोरो - बरं
नाही /नोको
एक् दोन - एक दोन
तुमाल् काय् पैजे? - तुम्हाला काय पाहिजे?
डावाह् पटीस - डाव्या बाजूस
उजवाह् पटीस - उजव्या बाजूस
येज् मोल् केवड? - हयाचे मोल केवढे (मूल्य/किंमत)
क्शम्ञताम - काय मणिंगुण कोंत
चिंता मास्तु - चिंता कर्नुकोंत
पुनः मिलाम - पुन्ना मिल्मुण
|
|||||