महाराष्ट्री भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. हिची व्युत्पत्ती संस्कृतातून झाल्याचे सांगितले जाते. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत[ संदर्भ हवा ].

ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला.

प्रमुख साहित्य[संपादन]

काही विद्वानांच्या मते, राजशेखर या इ.स.च्या १०व्या शतकातील नाटककाराने कर्पूरमंजरी हे नाटक महाराष्ट्री प्राकृतात लिहिले आहे[१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. सहस्रबुद्धे, पु.ग. (इ.स. १९७९). "साहित्य, कला व विद्या", महाराष्ट्र संस्कृती, तिसरी आवृत्ती (इ.स. २००३), कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृ. २२३. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.