क्षय रोग
| क्षय रोग | |
|---|---|
| ---- | |
क्षयरोगाच्या रूग्नाचा छातीचा एक्स्-रे |
|
| ICD-10 | A15–A19 |
| ICD-9 | 010–018 |
| OMIM | 607948 |
| DiseasesDB | 8515 |
| MedlinePlus | 000077 साचा:MedlinePlus2 |
| eMedicine | med/2324 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 |
| MeSH | D014376 |
क्षय रोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणार आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समाजाला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी म्हणुन ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जीवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस्' या प्रकार मुळे मानवामध्ये क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रूग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रीस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. इतिहास काळात माधवराव पेशवे, संगीतकार बिथोवन अशी महत्त्वाची व्यक्तिमत्वे या रोगाने ओढून नेली आहेत.हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारात अतिशय आवश्यक आहे.
- ते अवयव
- मेंदुची आवरणे,
- मणके व इतर हाडे,
- लैंगिक अवयव.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रकार
- फुफ्फुसाचा क्षयरोगः
- थुंकी दुषीत (स्पुटम पॉसिटिव्ह)
- थुंकी अदुषीत (स्पुटम निगेटिव्ह)
- फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा
- ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )
- हाडे व सांध्याचा क्षय्ररोग
- जनन व विसर्जन संस्थाचा क्षय्ररोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )
- मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टीम )
- आतडयाचा क्षय्ररोग
[संपादन] लक्षणे
दोन आठवडय़ांहून अधिक काळ
- बेडकयुक्त खोकला (२१ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )
- हलकासा परंतु रात्री येणारा ताप
- घटणारे वजन.
- भुक कमी होणे.
- बेडक्यातुन रक्त पडणे.
- थकवा
[संपादन] जीवाणू पसरण्याचे मार्ग
उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.
- दुषित धुलिकण
- बाधीत व्यक्तीची थुंकी.
- बाधीत व्यक्तीचे इतर स्राव
[संपादन] निदान
खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यावरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.
चाचण्या-
- खकाऱ्याची तपासणी-
- वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पध्दतीने पेशींना रंग देउन सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अश्या रुग्णास थुंकी दुषीत रुग्ण समजले जाते.
- लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतुन एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पधद्तीने पेशींना रंग देउन्टा सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते.
- मॉन्टुक्स टेस्ट व्दारेही त्याचे निदान केले जाते.
- रक्ताच्या तपासण्या-
- इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते[ संदर्भ हवा ].
[संपादन] आजारपणातील घ्यावयाची काळजी
- खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
- खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतूनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे व इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
- रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी
- लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे
- घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.
[संपादन] उपलब्ध उपचार
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दिड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे विषाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
[संपादन] औषधांचे दुष्परिणाम
या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.
[संपादन] अपंगत्व
[संपादन] आजार टाळण्यासाठीची काळजी
समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.
[संपादन] इतर प्रकार
फुफुसाखेरीज इतर अवयवांना होणार्या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मोनरी टी.बी. म्हणतात. हाडे, मेंदू, मूत्राशय अशा कुठल्याही अवयवाला क्षयरोगाची लागण होते. हा क्षयरोगाचा प्रकार मात्र संसर्गजन्य नसतो.
[संपादन] प्रयत्न
भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.
|
|||||