डेंग्यू ताप
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| डेंग्यू ताप | |
|---|---|
| ---- | |
डेंग्यू तापामुळे पातठिवर आलेले व्रण |
|
| ICD-10 | A90 |
| ICD-9 | 061 |
| DiseasesDB | 3564 |
| MedlinePlus | 001374 |
| eMedicine | med/528 |
| MeSH | C02.782.417.214 |
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.
भारतात 1963 साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगरं आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] लक्षणे
- डेंग्यू ताप
- एकदम जोराचा ताप चढणे
- डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
- डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
- स्नायू आणि सांध्यांमधे वेदना
- चव आणि भूक नष्ट होणे
- छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
- मळमळणे आणि उलट्या
- डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ)
- डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे
- तीव्र, सतत पोटदुखी
- त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे
- नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
- रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
- झोप येणे आणि अस्वस्थता
- रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते
- नाडी कमकुवतपणे जलद चालते
- श्वास घेण्याला त्रास होणे
[संपादन] प्रसार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.
[संपादन] ओषधोपचार
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप कमी होण्यासाठी ‘पेरासिटेमोल’ गोळ्या घ्याव्यात. तापासाठी किंवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत. निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी) रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||