कुर्दिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्दिस्तान

कुर्दिस्तानचा ध्वज

कुर्दी लोकांचे वास्तव्य असलेला भूभाग
भाषा कुर्दी, तुर्की, अरबीफारसी
स्थान पश्चिम आशिया: उत्तर मेसोपोटेमिया, झाग्रोस, आग्नेय अनातोलिया, वायव्य इराण, उत्तर इराक, ईशान्य सिरिया व आग्नेय तुर्कस्तानचे काही भाग[१]
क्षेत्रफळ (अंदाजे) १.९ लाख–३.९ लाख किमी²
लोकसंख्या ३.५ ते ४ कोटी (कुर्दी वस्ती) (अंदाजे)

कुर्दिस्तान (रोमन: Kurdistan) किंवा बृहद्कुर्दिस्तान (इंग्लिश: Greater Kurdistan) हा मध्य पूर्वेमधील एक ढोबळ व्याख्या असलेला असा भौगोलिक प्रदेश आहे, ज्यात कुर्द वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत आणि जिथे ऐतिहासिक काळापासून कुर्दी भाषा, संस्कृती आणि राष्ट्रकत्वाच्या जाणिवेचा फैलाव आहे. भौगोलिक दृष्ट्या तोरोस पर्वतरांगांच्या पूर्वेपासून झाग्रोस पर्वतरांगांच्या वायव्येपर्यंत कुर्दिस्तानाचा विस्तार मानला जातो.

वर्तमान भू-राजकीय संदर्भात पाहिल्यास तुर्कस्तानाचा आग्नेय भाग, इराकचा उत्तर भाग, सीरियाचा ईशान्य भाग व इराणचा वायव्य भाग या चार भागांमध्ये बृहद्कुर्दिस्तान विभागला गेला आहे. कुर्द लोकांमध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची प्रबळ भावना असून स्वतंत्र कुर्दी राष्ट्रासाठी किंवा स्वायत्ततेसाठी येथे सतत संघर्ष सुरू आहे. सध्या इराक देशामधील कुर्दिस्तानी भागाला स्वायत्तता आहे. इराण देशामध्ये देखील कुर्दिस्तान प्रांत आहे परंतु तो स्वायत्त नाही.

आर्बिलसुलेमानिया ही उत्तर इराकमधील दोन मोठी शहर कुर्दिस्तानचा भाग आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कुर्दिस्तान - डिक्शनरी.कॉमवरील व्याख्या". 2007-10-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]