होळकर घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होळकर घराणे/
इंदूर संस्थान

१७३११९४८
चिन्ह
इंदूर येथील होळकरांचा राजवाडा
राजधानी इंदूर, महेश्वर
शासनप्रकार संस्थान
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: मल्हारराव होळकर
अंतिम राजा: यशवंतराव होळकर
अधिकृत भाषा मराठी

होळकर घराणे हे भारतातील, इंदूर संस्थानचे संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.

होळकर घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती[संपादन]