आरती
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद · यजुर्वेद | |
| सामवेद · अथर्ववेद | |
| वेद-विभाग | |
| संहिता · ब्राह्मणे | |
| आरण्यके · उपनिषदे | |
| उपनिषदे | |
| ऐतरेय · बृहदारण्यक | |
| ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
| केन · मुंडक | |
| मांडुक्य ·प्रश्न | |
| श्वेतश्वतार ·नारायण | |
| वेदांग | |
| शिक्षा · चंड | |
| व्याकरण · निरुक्त | |
| ज्योतिष · कल्प | |
| इतिहास | |
| रामायण · महाभारत | |
| इतर ग्रंथ | |
| स्मृती · पुराणे | |
| भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
| पंचतंत्र · तंत्र | |
| स्तोत्रे | |
| मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
| शिक्षापत्री · वचनामृत | |
मनातील सर्व भावना एकवटुन 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती आरती. गणपतीस आद्यपूजेचा मान आहे,म्हणुन गणपतीची आरती सर्वप्रथम. त्यानंतर,कुलदैवताची, त्यापाठोपाठ, देवीची व इष्टदेवतेची आरती म्हणावी अशी परंपरा आहे.किमान 'तीन' आरत्या हव्याच अशी पध्दत आहे.त्यापेक्षा जास्त कितीही चालतात.पण त्या विषम संख्येत असाव्यात असा संकेत आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] गणपतीची आरती
गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे. (*Add poets name, meaning in contemporary prose, religious and cultural back ground)
- रचनाकार - समर्थ रामदास स्वामी
सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची,
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन, /(स्मरणे मात्रे मन), कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा , वाट पाहे सदना|
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
[संपादन] ॥ उदो बोला ॥
उदो बोला उदो, अंबाबाई माउलीचा हो ।
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।
उदो बोला उदो ॥ धृ॥
अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णु रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो ....॥धृ॥
द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो बोला उदो....... ॥ धृ ॥
तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥
उदो बोला उदो ....... ॥धृ॥
चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥
उदो बोला उदो अंबाबाई...... ॥धृ॥
पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥
षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥
उदो बोला उदो...... ॥धृ॥
सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥
अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥
उदो बोला उदो .......॥धृ॥
नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥
दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥
उदो बोला उदो....... ॥धृ॥ [१]
[संपादन] ॥ श्री देवीची आरती ॥
[२] दुर्गे दुर्गटभारी, तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे, करुणा विस्तारी ॥
वारी वारी, जन्म मरणांतें वारी । हारी पडलो आता, संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
त्रिभुवनी भुवनी पाहता, तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु, न बोलवे काही ॥
साही विवाद करता ,पडले प्रवाही । ते तू भक्तांलागी,ते तु दासालागी, पावसी लवलाही ॥२॥
जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
प्रसन्नवदने, प्रसन्न होशी निजदासा । क्लेशापासुन सोडी, तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून, कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला, पदपंकजलेशा ॥३॥
जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
[संपादन] ।। श्री शंकराची आरती ।।
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
- संत रामदास [३]
[संपादन] II श्री दत्ताची आरती II
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार, त्रैलोक्यराणा |
नेती नेति शब्द, न ये अनुमाना | सुरवर मुनिजन योगी, समाधि न ये ध्याना ||१||
जय देव जय देव, जय श्रीगुरूदत्ता | आरती ओवाळीतां, हरली भवचिंता ||धृ०||
सबाह्मा अभ्यंतरी, तूं एक दत्त | अभाग्यासी कैंची, न कळे ही मात |
पराही परतली, तेथें कैचा हेत | जन्ममरणाचा, पुरलासे अन्त || जय० ||२||
दत्त येउनियां, उभा ठाकला | साष्टांगे नमुनी, प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी, आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा, फेरा चुकविला || जय० ||३||
दत्त दत्त ऍसीं, लागले ध्यान | हरपलें मन, झालें उन्मन |
मीं तू पणाची, झाली बोळवण | एका जनार्दनी, श्रीदत्तध्यान || जय देव जय देव जय० ||४||
[संपादन] ॥ श्री विठोबाची आरती ॥
युगे अठ्ठावीस, विटेवरीं उभा | वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटि, परब्रह्म आहे गा | चरणी वाहे भीमा, उध्दारी जगा ||१||
जय देव जय देव, जय श्री पांडुरंगा | रखुमाईवल्लभा, राहींच्या वल्लभा, पावें जिवलगा ||धृ०||
तुळसीमाळा गळां, कर ठेवूनि कटीं | कांसे पीतांबर, कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर, नित्य येतीं भेटी | गरुड हनुमंत, पुढे उभे राहती || जय० ||२||
धन्य वेणूनाद, अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे, वनमाळा गळां |
राहे रखुंमाई, राणीया सकळा | ओवाळिती राजा, विठोबा सावळा || जय० ||३||
ओवाळूं आरत्या, कुरवंट्या येती | चंद्रभागेमाजी, सोडुनिंया देती |
दिंड्या पताका, वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा, वर्णावा किती || जय० ||४||
आषाढी कार्तिकी, भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये, स्नानें जे करिती |
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती | केशवासी नामदेव, भावें ओवाळिती || जय देव जय देव जय० ||५||
[संपादन] || श्री ज्ञानदेवाची आरती ||
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||
लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||
[संपादन] ।। देवी मंगल चंडिके ।।
रक्ष रक्ष जन्मदाता,देवी मंगल चंडिके। हारिके विपदां,हर्ष मंगल कारिके॥
हर्ष मंगल दक्षेच,हर्ष मंगल दायिके । शुभे मंगल दक्षेच,शुभे मंगल चंडिके ॥
मंगल मंगल दक्षेच,सर्व मंगल मांगल्ये। सदा मंगलदे देवी,सर्वेषां मंगलाल्ये॥
पुज्ये मंगळवारेच, मंगलाभिष्ठ्य देवते । पुज्ये मंगळ भुपस्य, मनुवंशस्य संतति ॥
मंगलाधिष्ठितां देवी, मंगलनांच मंगले । संसार मंगलधारे, मोक्ष मंगल दायीनी ॥
सारेच मंगलधारे, पारेच सर्व कर्मणा । प्रति मंगळवारेच, पूज्य मंगल सुखप्रदे ॥
[संपादन] घालीन लोटांगण
घालिन लोटांगण वंदीन चरण |
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे अलिंगन आनंदे पुजिन |
भावे ओवाळीन म्हणे नामा ||१||
त्वमेव माता च पिता त्वमेवच, त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ||२||
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, बुध्दयात्मना वा प्रकृतिस्वभावात |
करोमि यद्यत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ||३||
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे ||४||
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ||५||
[संपादन] || मंत्र पुष्पांजली ||
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:| ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम:| ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी| स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति| तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे| आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति|
[संपादन] संदर्भ
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |