अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ (फ्रेंच: Le tour du monde en quatre-vingts jours, ल तूर दु माँदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स ; अनुवादित इंग्लिश शीर्षक: Around the World in Eighty Days ;) ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु माँदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.
कथानक[संपादन]
कादंबरीत लंडनस्थित फिलियास फॉग ८० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करण्याची २०,००० ब्रिटिश पाउंडची (आत्ताचे साधारण १३,२४,३०० पाउंड) पैज लावतो. फॉग आपल्या नोकर पासेपार्तूबरोबर पूर्वेस प्रवास करीत युरोप, भारत, हाँगकाँग, जपान व अमेरिकेतून प्रवास करीत परत लंडनला पोचतो.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ - अज्ञात अनुवादकाने केलेला इंग्लिश अनुवाद. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |