स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया
Appearance
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ही कुटुंबनियोजन व कायम स्वरूपाचे संतती नियमन कार्यक्रमातील एक शस्त्रक्रिया आहे.
पद्धती
[संपादन]स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया दोन पद्धतींनी केली जाते.
- पारंपारिक शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली एक-दोन इंच लांबीचा छेद घेतात. यातून ओटीपोटातल्या गर्भनलिका धागा बांधून बंद करण्यात येतात. हेही ऑपरेशन सोपे असते. परंतु निदान सहा-सात दिवस रुग्णालयात राहावे लागते.
- लॅपरोस्कोपी (बिनटाक्याची- दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया) प्रकाराच्या शस्त्रक्रियेत पोटावरचा छेद लहान असतो. त्यातून दुर्बीण घालून त्याच्या मदतीने गर्भनलिका रबरी धाग्याने (सिलिअॅस्टिक बँडने) बंद करतात. या शस्त्रक्रियेनंतर चार-सहा तासांत घरी जाता येते.
शस्त्रक्रियेसाठी योग्यता
[संपादन]- किमान एक मूल ५ वर्षाचे असावे.
- पाळीवर किंवा प्रसूती नंतर दीड महिन्यानंतर.
- पी आय डी किंवा इतर आजार नसावेत.
शस्त्रक्रियेसाठी पूर्व तपासण्या
[संपादन]- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण,
- लघवीची गर्भधारणेसंबंधी तपासणी,
- वैद्यकीय तपासणी