खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.
प्रोजेस्टेरॉनयुक्त अंतर्गर्भाशयी उपकरण वापरून कुटुंबनियोजन करता येते. यामध्ये तांबी सारख्याच एका उपकरणाला प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनने आवेष्टित केलेले असते. हॉर्मोन हळूहळू विरघळते आणि विरघळलेले हॉर्मोन गर्भधारणा होऊ देत नाही. कुटुंब नियोजनाची ही पद्धत उलटवण्याजोगीआहे.