Jump to content

लॅपरोस्कोपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'ठळक मजकूर'लॅपरोस्कोपी (इंग्लिश: Laparoscopy ;) म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने उदरपोकळीमध्ये केली जाणारी किमान फाडतोड असणारी पद्धतीची शस्त्रक्रिया आहे.

पद्धती

[संपादन]
लॅपरोस्कोपीसाठी वापरले जाणारी हत्यारे
लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करताना शल्यकर्मी
यांत्रिक पद्धतीने लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया
  • या शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या त्वचेवर १ ते ३ ठिकाणी ०.५ ते १.५ सेमीचा चिरले जाते.
  • त्यातील एका छिद्रातून अनकुचीदार टोक असलेली नळी उदरपोकळीत घातली जाते.
  • त्यातून तयार झालेल्या छिद्रातून उदरपोकळी फुगवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायु सोडला जातो.
  • उदरपोकळी फुगवण्यानंतर दुर्बीण टाकली जाते.
  • दुसऱ्या छिद्रातून छायाचित्रणासाठी कॅमेरा सोडला जातो की जो टी.व्ही.ला जोडलेला असतो की ज्यात पाहुन शस्त्रक्रिया केली जाते.
  • तिसऱ्या छिद्रातून शीतप्रकाश ऑप्टिकल फायबर केबलच्या साहाय्याने सोडला जातो.
  • पहिल्या छिद्रतुन हत्यारांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते.

शक्य शस्त्रक्रिया

[संपादन]

परंपरागत शस्त्रक्रिया व लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया यांमधील फरक

[संपादन]
  • नेहमीच्या परंपरागत शस्त्रक्रियेत पोटावर मोठा छेद असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अधिक वेदना होतात व रुग्णाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वासाचा वेग मंदावल्यामुळे ‘न्युमोनिया’ होण्याचा धोका असतो. दम्याचा, तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांत हा त्रास जास्त असतो.
  • वेदनाशामक गोळ्यांचा उपयोग अधिक करावा लागतो. वेदनांमुळे शरीरात ‘स्ट्रेस हार्मोन्स’ जास्त प्रमाणात तयार होतात. रुग्णास लवकर कामावर रूजू होता येत नाही.
  • मोठा छेद असल्यामुळे जंतूसंसर्ग जास्त होण्याची शक्यता असते किंवा रक्त देण्याची गरज भासते.
  • शस्त्रक्रियेनंतर ‘इन्सिजनल’ (जखमेतून) हर्निया होऊ शकतो.
  • जखम मोठी असल्याकारणाने शारीरिक व्यायाम काही महिने करता येत नाही.
  • पोटातील अवयवांना अधिक काळ हस्तस्पर्श झाल्याने आतडी एकमेकांना चिकटण्याची शक्यता वाढते व नंतर आतड्यांना रुकावट (इन्टेस्टिनल ऑबस्ट्रक्शन) होण्याची शक्यता असते.
  • सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ही शस्त्रक्रिया तोट्याची ठरते.
  • परंपरागत शस्त्रक्रियांत शल्यचिकित्सकाला खास तंत्राची किंवा विशिष्ट वेगळ्या उपकरणांची गरज भासत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमी खर्चाचे असते; पण दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकाला खास शिक्षणाची आवश्यकता असते. तसेच त्यासाठी आधुनिक उपकरणे लागतात. त्यामुळे दुर्बिणीची शस्त्रक्रिया थोडी खर्चिक असते. पण रुग्णालयात राहण्याचा व अन्य खर्च, औषधांचा खर्च कमी असतो. शिवाय रुग्णाला लवकर कामावर जाता येते. त्यामुळे ‘दुर्बिणीची’ शस्त्रक्रिया ‘परंपरागत’ शस्त्रक्रियेपेक्षा फायदेशीर ठरते.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे

[संपादन]
  • छेद फक्त ०.५ सें. मी. ते १.५ सें. मी.चा असल्याने वेदना अगदी नगण्य, वेदनाशामकांचा वापर कमी.
  • रक्तस्राव काही थेंबच असतो.
  • जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी.
  • श्वासोच्छवासाचा त्रास नाही.
  • प्रत्यक्ष हस्तस्पर्श न झाल्याने आतडी चिकटण्याची शक्यता नाही.
  • रुग्णास लगेचच कामावर रूजू होता येते.
  • छेद लहान असल्यामुळे व्यायाम व सौंदर्याच्या दृष्टिकोनातून उत्तम असते.

बाह्य दुवे