Jump to content

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
प्रथम वापर दिनांक १८८९
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल <०.१%
विशिष्ट असफल ०.१५%
वापर
परिणामाची वेळ कायमस्वरुपी
उलटण्याची शक्यता शक्य
वापरकर्त्यास सूचना शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ नाही
फायदे कमी भूलीत होणारी शस्त्रक्रिया
जोखीम शस्त्रक्रियेच्या जागेवर तात्पुरती सुज


पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे.ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा करता येते.या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते.

शस्त्रक्रियेची पद्धती[संपादन]

या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात.अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढता येते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते.योग्य तऱ्हेने केलेल्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया जवळजवळ १००% परिणामकारक ठरतात. ही शस्त्रक्रिया केल्यावर शुक्रजंतू तयार होणे आणि संप्रेरके तयार होणे थांबत नाही.

प्रसार व स्वीकार[संपादन]

या अत्यंत सोप्या व निर्धोक शस्त्रक्रियेचा पुन्हा प्रसार होणे आवश्यक आहे. पुरुषी अहंकारापोटी व 'अशक्तपणा येतो' हे खोटे कारण सांगून पुरुष टाळाटाळ करतात व स्त्रियांवर शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी टाकतात. कुटुंब नियोजनाअंतर्गत ही शस्त्रक्रिया सुचवली जाते.

उलटवण्याची पद्धती[संपादन]

पुन्हा प्रजननासाठी आवश्यक वाटल्यास कापून अलग केलेल्या नसा शस्त्रक्रियेने परत जुळवता येतात- त्यात ५० टक्के यशाची शक्यता असते. उलटवण्याची पद्धत ही महागडी असते. गाठ सुटल्यास उलटू शकते.