"वुएलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २: ओळ २:


==इतिहास==
==इतिहास==
या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते [[इबिझा]] या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरवातीला दोन [[एरबस ए३२०]] प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते [[ब्रसेल्स]], इबिझा, [[पाल्मा दे मायोर्का]] आणि [[पॅरिस-चार्ल्स दि गॉल विमानतळ|पॅरिस]] शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.vueling.com/en/we-are-vueling/us/our-dna |title= वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=वूईलिंग.कॉम |दिनांक=११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते [[इबिझा]] या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरूवातीला दोन [[एरबस ए३२०]] प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते [[ब्रसेल्स]], इबिझा, [[पाल्मा दे मायोर्का]] आणि [[पॅरिस-चार्ल्स दि गॉल विमानतळ|पॅरिस]] शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.vueling.com/en/we-are-vueling/us/our-dna |title= वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=वूईलिंग.कॉम |दिनांक=११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>


वुएलिंगने २००५ मध्ये [[माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळ|माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन]] तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये [[सेव्हिया आंतरराष्ट्रीय विमानतळ|सेव्हियापासून]] सेवा सुरू केली.
वुएलिंगने २००५ मध्ये [[माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळ|माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये [[सेव्हिया आंतरराष्ट्रीय विमानतळ|सेव्हियापासून]] सेवा सुरू केली.


{{बदल}}
{{बदल}}

२२:५४, २२ मार्च २०२२ ची आवृत्ती

वुएलिंग ही स्पेनची किफायतशीर विमानकंपनी आहे. हिचे मुख्य केंद्र बार्सिलोना येथे आहे. या कंपनीचे नाव वुएलो (विमान) या स्पॅनिश शब्दावरून आहे. हिचे मुख्यालय बार्सेलोना महानगरात असून मुख्य तळ बार्सेलोना-एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रोमच्या लिओनार्दो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.

इतिहास

या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते इबिझा या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरूवातीला दोन एरबस ए३२० प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते ब्रसेल्स, इबिझा, पाल्मा दे मायोर्का आणि पॅरिस शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.[१]

वुएलिंगने २००५ मध्ये माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये सेव्हियापासून सेवा सुरू केली.

२००८ मध्ये या कंपनीत स्पॅनिश क्लिक एयर समाविष्ट झाली. क्लिकएयरचे आलेक्ष क्रुज हे या एकत्रीकरण झालेल्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.[२] दि.१५ जुलै २००९ रोजी या दोन विमान कंपनीचे एकत्रीकरण कायदेशीर पूर्ण झाले आणि नवीन कंपनी वुएलिंग ब्रँडने सुरू झाली.[३]

सन २००९ मध्ये ५० ठिकाणी ८.२ मिल्लियन प्रवासी वाहतूक करणारी स्पेन मधील दोन क्रमांकाची ही विमान कंपनी ठरली.[४]

जानेवारी २०११ मध्ये नवीन ९ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यापैकि ६ विमाने एप्रिल ते जून २०११ चे दरम्यान ताब्यात आली आणि राहिलेली दोन २०११ चे शेवटी मिळाली.२१ मार्च २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आलेक्ष क्रुज यांनी रोम हे नवीन बेस निर्माण करण्याची घोषणा केली. दि.२५ मार्च २०१२ रोजी त्याचे उद्घाटन झाले आणि तेथे एक विमान तैनात केले. रोम मध्ये आत्तापर्यंत अनेक आगमन ठिकाणे निर्माण झाली आहेत.

दि.५ डिसेंबर २०१२ रोजी या विमान कंपनीने फ्लोरेंस येथे बेस निर्माण करण्याची घोषणा केली आणि तेथे एक विमान ठेऊन युरोप मधील नवीन चार ठिकाणी विमान सेवा सुरू केली. दि.२५ ऑक्टोबर २०१३ रोजी म्हणजे १० महिन्यांनंतर या कंपनीने फ्लोरेन्स ते कटणीय ही इटलीतील पहिली स्थानिक विमान सेवा सुरू केली.

नोव्हेंबर २०१३ पासून या कंपनीने सतत बार्सिलोना केंद्राचे विकासाचा मार्ग अवलंबिला. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ब्रुसेल्स येथे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आणि येथे एक विमान ठेऊन पुर्वीचे चार मार्गाबरोबरच मे २०१४ पासून नवीन ७ मार्ग सुरू केले. शिवाय नोव्हेंबर २०१३ मध्ये रोम-फिउमिकीनो केंद्र निर्माण केले.

सन २०१४ चे मध्यापासून तेथून ३० विमान मार्ग अस्तित्वात आले. त्यांचे हे बार्सिलोना नंतरचे दुसरे क्रमांकाचे केंद्र ठरले. कंपनीचे संकल्पनाचे पुंनर्रजीवन करण्यासाठी आणि व्यवस्थापनातील कांही बदल घडविण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये या कंपनीने ब्रुसेल्स,कटणीय,पालेर्मो ही केंद्रे बंद केली.

करार

वुएलिंगचे खालील कंपन्यांशी व्यापारी करार आहेत -

विमानताफा

जुलै २०१६अखेर वुएलिंगकडे खालील विमानताफा होता.[५]

विमान प्रकार सध्या सेवेत मागणी प्रवासी सेरा
एरबस ए३१९-१०० १४४ १ विमान इबेरीय कडून भाड्याने घेतले
एरबस ए३२०-२०० ९४ ३२ १७४ १८० १८६
एरबस ए३२१-२०० १० - २२० -
एकूण ११० ३५ - -

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास".
  2. ^ "वूईलिंग आणि स्पॅनिश क्लिक एयर यांनी विलीन होण्यास सहमति दिली".
  3. ^ "यूके तील हवाई परिवहन मधील एक नवीन नाव".
  4. ^ "वूईलिंग एअरलाइन्सची सेवा".
  5. ^ "वूईलिंग एअरलाइन्सचा विमानसंच तपशील".