"विकिपीडिया:सद्य घटना/फेब्रुवारी २००८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४४: ओळ ४४:
|चित्र_रूंदी =
|चित्र_रूंदी =
|चित्र_शिर्षक =
|चित्र_शिर्षक =
|बातमी मजकूर =इथे महाराष्ट्र दिनच साजरा व्हायला हवा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍याला पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 'हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने पालिकेच्या कामकाजात हिंदीचा वापर झाला पाहिजे', अशी मागणी करत काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.
|बातमी मजकूर =इथे [[महाराष्ट्र दिन]]च साजरा व्हायला हवा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍याला पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 'हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने पालिकेच्या कामकाजात हिंदीचा वापर झाला पाहिजे', अशी मागणी करत काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.


सभागृहाच्या बैठकीत या सूचनेचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. या सूचनेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात भरणार्‍या सभागृहाच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही सूचना असावी, असेही त्यांनी सांगितले.
सभागृहाच्या बैठकीत या सूचनेचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. या सूचनेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात भरणार्‍या सभागृहाच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही सूचना असावी, असेही त्यांनी सांगितले.

२३:४४, ६ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

फेब्रुवारी २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ >>


दि. ०१.०२.२००८

ऑक्‍स्फर्ड शब्दकोश...सव्वाशे वर्षांचा वाटाड्या!
ऑक्‍स्फर्ड शब्दकोश...सव्वाशे वर्षांचा वाटाड्या!
ऑक्‍स्फर्ड शब्दकोश...सव्वाशे वर्षांचा वाटाड्या!
तीन लाख नवीन शब्द, ३५ कोटी शब्द, एक लाख ६९ हजार वाक्‍प्रचार, ५ लाख ७७ हजार संदर्भ...हा पसारा आहे ऑक्‍स्फर्ड शब्दकोशाचा. जगभरात नावाजला गेलेला हा शब्दकोश जगभरातील बदलत्या शब्दांची, वाक्‍यांची दखल घेत इंग्रजी शब्दांसाठीचा वाटाड्या बनून गेला आहे. आज तो सव्वाशेव्या वर्षात पदार्पण करतो आहे.

ऑक्‍स्फर्ड शब्दकोशाचा पहिला खंड १ फेब्रुवारी १८८४ रोजी प्रसिद्ध झाला. "अ न्यू इंग्लिश डिक्‍शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स; फाऊंडेड मेनली ऑन द मटेरिअल्स कलेक्‍टेड बाय द फिलॉलॉजिकल सोसायटी' असे त्याचे लांबलचक नाव होते. ३५२ शब्दांच्या खंडात "ए' पासून "अँट'पर्यंतच्या शब्दांचा समावेश होता. हळूहळू हा डोंगर वाढत गेला आणि संपूर्ण एकत्रित शब्दकोश तयार व्हायला १९ एप्रिल १९२८ ही तारीख उजाडावी लागली. १९३३ मध्ये या शब्दकोशाला "ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी' असे नाव मिळाले. १९५७ नंतर जगभरातील बोली भाषांतील शब्दांची जोड या शब्दकोशात द्यायला सुरवात झाली आणि जे शब्द वापरले जात नाहीत, ते काढून टाकणेही सुरू झाले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे या शब्दकोशाचे संगणकीकरण करणे आवश्‍यक बनले आणि त्यासाठी "न्यू ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी' हा प्रकल्प सुरू झाला. संगणकीकरणासाठी १२० टाइपरायटर्सनी तब्बल ३५ कोटी कॅरॅक्‍टर्स टाइप केली. १९८९ मध्ये या प्रकल्पातील "न्यू' हे नाव काढून टाकण्यात आले आणि "ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी-२' या नावाने खंड प्रकाशित करण्यात आला. १४ मार्च २००० रोजी या शब्दकोश माहितीच्या महाजालात पूर्णपणे समाविष्ट झाला....

सकाळ


शिर्डीतून मराठी हद्दपार!
शिर्डीतून मराठी हद्दपार!
शिर्डीतून मराठी हद्दपार!
शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शंका यावी अशा तेलुगू, तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात.

' रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात . मराठीचा वापर करण्याविषयी राज्य सरकारचे लेखी आदेश असले तरी स्थानिक नगरपालिका प्रशासन व तहसिलदारांच्या आशीर्वादाने हा आदेश शिर्डीकरांनी केव्हाच धाब्यावर बसविला आहे .

' सर्व जातिपंथाचे प्रतिक ' या भावनेने भाविकांची वर्दळ वाढू लागली आणि शिर्डी हे खेडे शहर बनले . चहाची टपरी , स्टार हॉटेले , लॉजिंग , टांगा , रिक्षा , लक्झरी बसेस , ए . सी . कार , वडा व भजेवाले , फुलविक्रेते , कटलरी , प्रसाद अशा सर्वच व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे . गिर्‍हाईकांच्या शोधासाठी या सगळ्यांचे दोन हजार एजंट ( शिर्डीत त्यांना ' पॉलीशवाले ' म्हणतात ) आहेत . भिकार्‍यांची संख्या दोन हजाराच्या आसपास आहे . भाविक शिर्डीत उतरत नाही तोच ४ - ५ एजंटांचा त्याच्याभोवती गराडा पडतो आणि ' क्या चाहिए ? लॉज , दर्शन , फुलप्रसाद , अच्छा खाना , नहाने के लिए गरम पानी ...' अशा प्रश्नांचा भडिमार होतो . संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही . त्यामुळे आपण महाराष्ट्राऐवजी अन्य कुठल्या प्रांतात तर आलो नाही ना , हा विचार मराठी माणसाच्या मनाला नक्कीच भिडतो .....

मटा.


पालिकेत हिंदीचा आग्रह
इथे महाराष्ट्र दिनच साजरा व्हायला हवा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍याला पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 'हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने पालिकेच्या कामकाजात हिंदीचा वापर झाला पाहिजे', अशी मागणी करत काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.

सभागृहाच्या बैठकीत या सूचनेचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. या सूचनेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात भरणार्‍या सभागृहाच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही सूचना असावी, असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून पालिकेचा कारभार मराठीतून व्हावा, याकरीता मी आग्रही राहिलो आहे. मात्र, सभागृहाच्या तसेच विविध समित्यांच्या बैठकीत सदस्यांना कोणत्याही भाषेत बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सभेचे वृत्तांत किंवा कार्यक्रमपत्रिका मात्र मराठी तसेच इंग्रजी भाषेतून दिली जाते. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे व पालिकेतील काही सदस्य हिंदीतून बोलतात. ज्याप्रमाणे त्यांच्या भाषणांची नोंद मराठी व इंग्रजीत भाषेत होते, तशीच नोंद हिंदी भाषेत झाली पाहिजे, तसेच कार्यक्रम पत्रिकाही हिंदीतून द्यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

मटा.

दि. ०४.०२.२००८

बम्बई नही आई तो कहाँ जाइ...
कुर्ल्याचे लोकमान्य टिळक टर्मिनस... दुपारची वेळ... पोलिसांचा कडक बंदाबस्त... नातेवाईकांची गर्दी... 'अब बाहर माहौल कैसा है, यहाँपर कुछ गडबड तो नहीं होगी ना'... अशा चचेर्तच पटना एक्स्प्रेसचे टमिर्नसमध्ये आगमन झाले. पण, स्टेशनवर न रेंगाळता प्रत्येकजण मिळेल ती रिक्षा पकडून सटकत होता.

रविवारी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाची माहिती अनेकांच्या वाजणार्‍या मोबाइलवरुन ट्रेनमध्ये पोहोचली होती. 'हम बम्बई नहीं आई तो कहाँ जाई...', मुंबईत पहिल्यांदाच पाय ठेवत असलेल्या अनेकांच्या तोंडून उमटणारी हीच प्रतिक्रिया उमटत होती. ..

मटा.


कायदा हातात घेणार्‍यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
विशिष्ट राज्यातील लोकांच्या विरोधात भूमिका घेणे चूक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कायदा हातात घेणारी व्यक्ती कोणीही असो, अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई होईल, असा निर्वाळा आज येथे दिला.

सर्वांनीच संयम पाळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले...

सकाळ

दि. ०५.०२.२००८

तुकाराम महाराज गाथा आता चौदाहून अधिक भाषांत
वारकरी संप्रदायावर अमृतवर्षाव केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे गेल्या चार दशकांत चौदाहून जास्त भाषेत रूपांतर झाले असून; इटालियनमध्ये भाषांतराला नुकताच प्रारंभ झाला आहे. महाराजांच्या जन्म चतुःशताब्दी सोहळ्यानिमित्त ही मौलिक भेट म्हणता येईल...
सकाळ


विख्यात अक्षरांकनकार र.कृ. जोशी यांचे निधन
अक्षरांकन (कॅलिग्राफी) हा कलाप्रकार भारतात रुजविणारे व त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे र.कृ. जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अमेरिकेत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते...
लोकसत्ता

हे सुद्धा पहा