पुरुषोत्तम जोग
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
पुरुषोत्तम जोग हे पुण्यात राहणारे वाद्यदुरुस्ती क्रणारे व्यावसायिक आहेत.
त्यांचे मूळ गाव कोकणातील चिपळूण असून ते उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले. त्यांच्याकडे बी.कॉमची पदवी असून त्यांनी स्टेट बँकेमध्ये नोकरी केली. त्यांनी फरासखान्यासमोर राहणाऱ्या बाबूराव क्षीरसागर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले. तबलावादनाचे दोन-चार महिने शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्याचकडून तबला दुरुस्ती शिकले. तबला दुरुस्तीचे शिक्षण घेत असताना तपकीर गल्लीमध्ये राहणारे नानासाहेब घोटणकर यांच्याकडून त्यांना ऑर्गन दुरुस्तीचे प्रशिक्षण मिळाले.
पुढे पुरुषोत्तम जोग यांना अविनाश गोडबोले यांनी व्हायोलिन आणि हेमंत गोडबोले यांनी पियानो आणि ॲकॉर्डियन या वाद्यांच्या दुरुस्तीचे शिक्षण दिले. शेवटी २००० साली नोकरी सोडून देऊन जोगांनी पुण्यात माणिकबाग येथे वाद्यांच्या दुरुस्तीचे दुकान सुरू केले. त्यांच्या दुकानात संवादिनी, ऑर्गन, सतार, बासरी, दिलरुबा, पियानो, व्हायोलिन, संतूर, तबला, गिटार, ॲकॉर्डियन, तंबोरा अशा वेगवेगळ्या वाद्यांची दुरुस्ती होते.
पुरुषत्तम जोगांनी २००० ते २०१५ या पंधरा वर्षात दुरुस्त केलेली वाद्ये
[संपादन]- ॲकॉर्डियन – ३
- ऑर्गन – ५
- गिटार – २००
- तबला-ढोलक – १०००
- तंबोरे – १००
- दिलरुबे – १०
- पायपेट्या – ६
- संवादिनी – ९५०
- व्हायोलिन – ५०
पुरस्कार
[संपादन]निरपेक्षवृत्तीने करीत असलेल्या संगीतविषयक कार्याबद्दल पुण्यातील गानवर्धन संस्थेने पुरुषोत्तम जोग यांना २७ डिसेंबर २०१५ रोजी वाद्य कारागीर पुरस्कार प्रदान केला.