Jump to content

कालाब्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कालाब्रिया
Calabria
इटलीचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

कालाब्रियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
कालाब्रियाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी कातान्झारो
क्षेत्रफळ १५,०८१ चौ. किमी (५,८२३ चौ. मैल)
लोकसंख्या २०,०९,२२७
घनता १३३.२ /चौ. किमी (३४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-78
संकेतस्थळ http://www.regione.calabria.it

कालाब्रिया (इटालियन: Calabria) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस आयोनियन समुद्र, पश्चिमेला तिऱ्हेनियन समुद्र, नैऋत्येला मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे सिसिली तर उत्तरेला बाझिलिकाता प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात नेपल्सदोन सिसिलींच्या राजतंत्रांचा भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. कातान्झारो ही कालाब्रियाची राजधानी तर रेद्जो कालाब्रिया हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे ऑलिव्हची आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]