मेसिनाची सामुद्रधुनी
Jump to navigation
Jump to search
मेसिनाची सामुद्रधुनी (इटालियन: Stretto di Messina) ही दक्षिण युरोपामधील एक सामुद्रधुनी आहे. भूमध्य समुद्रामधील ही सामुद्रधुनी सिसिली बेटाला इटालियन द्वीपकल्पापासून अलग करते व तिऱ्हेनियन समुद्राला आयोनियन समुद्रासोबत जोडते. सर्वात अरुंद भागात ह्या सामुद्रधुनीची रुंदी केवळ ३.१ किमी आहे.
इटलीच्या कालाब्रिया प्रदेशामधील रेद्जो कालाब्रिया हे सर्वात मोठे शहर तसेच सिसिलीमधील मेसिना हे शहर ह्याच सामुद्रधुनीवर वसलेली आहेत.