Jump to content

१९८४ शीखविरोधी दंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Masacre antisij (es); ১৯৮৪ শিখ-বিরোধী দাঙ্গা (bn); émeutes anti-Sikhs de 1984 (fr); Massacre antisikh de 1984 a Delhi (ca); १९८४ शीखविरोधी दंगल (mr); Anti-Sikh-Pogrome in Indien 1984 (de); Massacre dos sikhs em 1984 (pt); 1984ء کے سکھ مخالف فسادات (ur); ১৯৮৪ শিখ বিৰোধী সংঘৰ্ষ (as); 反錫克教暴動 (zh); أعمال الشغب ضد السيخ 1984 (ar); 1984 سکھ مخالف دنگے (pnb); 1984年反シク教徒暴動 (ja); Antisikh-opptøyene i 1984 (nb); 1984 ਸਿੱਖ ਵਿਰੋਧੀ ਦੰਗੇ (pa); Kerusuhan anti-Sikh 1984 (id); Pogrom na sikhach z 1984 roku (pl); 1984-ലെ സിഖ് വിരുദ്ധ കലാപം (ml); 1984 సిక్ఖు వ్యతిరేక అల్లర్లు (te); सिक्खविरोधिहिंसा (sa); १९८४ सिख विरोधी दंगे (hi); ಸಿಖ್ ಹತ್ಯಾಕಾಂಡ (೧೯೮೪ರ ಸಿಖ್ ವಿರೋಧೀ ಗಲಭೆ) (kn); 시크 학살 (ko); 1984 anti-Sikh Genocide (en); pogromo kontraŭ sikoj en 1984 (eo); ᱑᱙᱘᱔ ᱥᱤᱠᱷᱚ ᱵᱤᱨᱚᱫᱷᱤ ᱫᱚᱸᱜᱮ (sat); 1984 ஆம் ஆண்டு சீக்கியர்களுக்கு எதிரான வன்முறை (ta) भारतामध्ये दंगल (mr); భారతదేశంలో అల్లర్లు (te); ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਦੰਗੇ (pa); Genocide in India (en); भारत में नरसंहार (hi); സിഖ് വംശത്തിൽ പെട്ടവർക്കെതിരെ പ്രതികാര ലക്ഷ്യത്തോടെ നടത്തിയ ആക്രമണം (ml); série de pogroms organizados na Índia após o assassinato da primeira-ministra Indira Gandhi (pt) Masacre Antisikh (es); Pembantaian Sikh 1984 (id); 1984 anti-Sikh riots, സിഖ് വിരുദ്ധ കലാപം, 1984 സിഖ് വിരുദ്ധ കലാപം (ml); Opptøyene i Nord-India 1984 (nb); 1984 के सिख दंगा (hi); 1984 సిక్కు వ్యతిరేక అల్లర్లకు (te); १९८४ शीख नरसंहार (mr); 1984 Anti-Sikh Riots, 1984 Sikh Massacre (en); kontraŭ-sika pogromo de 1984, pogromo kontraŭ siĥoj en 1984 (eo); 1984年反錫克教暴動, 1984年反锡克教骚乱 (zh); 1984 ஆம் ஆண்டு சீக்கயர்களுக்கு எதிரான வன்முறை (ta)
१९८४ शीखविरोधी दंगल 
भारतामध्ये दंगल
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmassacre,
pogrom,
दंगल
स्थान पंजाब, दिल्ली, भारत
तारीखनोव्हेंबर ३, इ.स. १९८४
आरंभ वेळऑक्टोबर ३१, इ.स. १९८४
शेवटनोव्हेंबर ३, इ.स. १९८४
मृत्युंची संख्या
  • २,८०० (official)
  • ८,००० (unofficial)
Map३०° ४६′ १२″ N, ७५° २८′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१९८४ शीखविरोधी दंगल, (किंवा १९८४ शीख नरसंहार), ही इंदिरा गांधींच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून भारतातल्या शिखांविरूद्धची एक संघटित नरसंहाराची मालिका होती. सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दंगलीतील जमावाशी सक्रियपणे सहभागी होती.[][][] स्वतंत्र स्त्रोतांकडून मृत्यूची संख्या अंदाजे ८,००० - १७,००० आहे;[][][] तर सरकारच्या अंदाजानुसार दिल्लीत २,८०० आणि देशभरात फक्त ३,३५० शीख ठार झाले असे नोंदवले आहे.[][]

पार्श्वभूमी

[संपादन]

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीस भारताकडून स्वातंत्र्य मिळविण्याच्या मागणी करणाऱ्या सशस्त्र शीख फुटीरवादी खलिस्तान चळवळीमुळे हिंसाचार सुरू झाला. जुलै १९८२ मध्ये शीख राजकीय पक्षाच्या अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल यांनी जरनैल सिंह भिंद्रनवाले यांना अटक टाळण्यासाठी स्वर्ण मंदिर, अमृतसरमध्ये राहण्याचे आमंत्रण दिले होते. भिंद्रनवाले शीख संघटना दमदमी टकसालचे लष्करी नेते होते. नंतर भिंद्रनवाले यांनी स्वर्ण मंदिरात शस्त्रे साठवली आणि आपले मुख्यालय बनविले. अकाली धर्मयुद्ध मोर्चाच्या स्थापनेपासून ऑपरेशन ब्लू स्टार पर्यंत सुरू असलेल्या हिंसक घटनांमध्ये अतिरेक्यांनी अनेक हिंदू, निरंकारी व शीखही ठार झाले होते. ऑपरेशन ब्लू स्टार ही एक भारतीय लष्करी कारवाई होती. १ ते ८ जून १९८४ दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वर्ण मंदिराच्या इमारतींमधून अतिरेकी धार्मिक नेते जरनैल सिंह भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र अतिरेक्यांना हटविण्याचा आदेश दिले. भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाला आणि मंदिर परिसरातून अतिरेक्यांना हटविण्यात आले. जगभरातील शिखांनी मंदिर परिसरातील लष्करी कारवाईची टीका केली होती. कारवाईनंतर चार महिन्यात ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचा दोन शीख अंगरक्षक, सतवंतसिंग आणि बेअंतसिंग यांनी सूड उगवून हत्या केली.

दंगल

[संपादन]

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, दुसऱ्याच दिवशी शीखविरोधी दंगल उसळली ती कित्येक दिवस चालू राहिली. दिल्लीच्या सुलतानपुरी, मंगोलपुरी, त्रिलोकपुरी व इतर ट्रान्स-यमुना भागात सर्वाधिक परिणाम झाला. लोखंडी सळ्या, चाकू आणि दहनशील साहित्य (रॉकेल आणि पेट्रोलसह) घेऊन हल्ले झाले. त्यांनी शीख परिसरात प्रवेश केला आणि शिखांना अंदाधुंदपणे ठार मारले आणि दुकाने व घरे नष्ट केली. सशस्त्र जमावांनी दिल्ली आणि जवळच बस आणि गाड्या थांबविल्या आणि शीख प्रवाशांना बाहेर काढले; काही जिवंत जाळण्यात आले. इतरांना त्यांच्या घराबाहेर ओढले गेले व त्यांना ठार मारण्यात आले. अनेक शीख महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले.[][१०][११]

३१ ऑक्टोबरच्या रात्री आणि १ नोव्हेंबरच्या सकाळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक समर्थकांमध्ये पैसे आणि शस्त्रे वाटप करण्यासाठी भेट घेतली. काँग्रेसचे खासदार सज्जन कुमार आणि कामगार संघटनेचे नेते ललित माकन यांनी हल्लेखोरांना 100 रुपयाच्या नोटा आणि दारूच्या बाटल्या दिल्या. १ नोव्हेंबरला सकाळी सज्जन कुमारने पालम कॉलनी, किरण गार्डन आणि सुलतानपुरीच्या दिल्ली परिसरात मोर्चाचे आयोजन केले. किरण गार्डनमध्ये कुमार यांनी पार्क केलेल्या ट्रकमधून १२० जणांच्या गटाकडे लोखंडी सळ्या वितरित करताना "शीखांना ठार मारा" असा आदेश देत होते.[१२][१३]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Bedi, Rahul (1 November 2009). "Indira Gandhi's death remembered". BBC. 2 November 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2009 रोजी पाहिले. The 25th anniversary of Indira Gandhi's assassination revives stark memories of some 3,000 Sikhs killed brutally in the orderly pogrom that followed her killing
  2. ^ Jeffrey M. Shaw Ph.D.; Timothy J. Demy Ph.D (2017-03-27). War and Religion: An Encyclopedia of Faith and Conflict [3 volumes]. ABC-CLIO. p. 129. ISBN 978-1610695176.
  3. ^ Paul R. Brass (October 1996). Riots and Pogroms. NYU Press. p. 203. ISBN 978-0814712825.
  4. ^ Nelson, Dean (2014-01-30). "Delhi to reopen inquiry in to massacre of Sikhs in 1984 riots". Telegraph.co.uk. 3 May 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Jagdish Tytler's role in 1984 anti-Sikh riots to be re-investigated". NDTV.com. 3 May 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Diplomat, Akhilesh Pillalamarri, The. "India's Anti-Sikh Riots, 30 Years On". The Diplomat. 3 May 2016 रोजी पाहिले.
  7. ^ https://thewire.in/communalism/what-delhi-hc-order-on-1984-anti-sikh-pogrom-says-about-2002-gujarat-riots
  8. ^ https://www.ndtv.com/india-news/why-gujarat-2002-finds-mention-in-1984-riots-court-order-on-sajjan-kumar-1963730
  9. ^ "The Tribune, Chandigarh, India - Perspective". www.tribuneindia.com. 2018-04-03 रोजी पाहिले.
  10. ^ Joseph, Paul (2016-10-11). The SAGE Encyclopedia of War: Social Science Perspectives. SAGE. p. 433. ISBN 978-1483359885. around 17,000 Sikhs were burned alive or killed
  11. ^ North, Andrew (2014-02-18). "Delhi 1984: India's Congress party still struggling to escape the past" (इंग्रजी भाषेत). 14 May 2016 रोजी पाहिले.
  12. ^ Kaur, Jaskaran; Crossette, Barbara (2006). Twenty years of impunity: the November 1984 pogroms of Sikhs in India (PDF) (2nd ed.). Portland, OR: Ensaaf. p. 27. ISBN 978-0-9787073-0-9. 2012-01-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 November 2010 रोजी पाहिले.
  13. ^ Kaur, Jaskaran; Crossette, Barbara (2006). Twenty years of impunity: the November 1984 pogroms of Sikhs in India (PDF) (2nd ed.). Portland, OR: Ensaaf. pp. 27–28. ISBN 978-0-9787073-0-9. 2012-01-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 November 2010 रोजी पाहिले.