यशवंतराव होळकर
| लिंग | पुरूष |
|---|---|
| जन्म तारीख | ३ डिसेंबर 1776, 1775 |
| जन्मस्थान | माळवा |
| मृत्यू तारीख | २७ ऑक्टोबर 1811 |
| मृत्यूस्थान | Bhanpura |
| वडील | तुकोजी होळकर |
| अपत्य | तिसरे मल्हारराव होळकर |
| कुटुंब | होळकर घराणे |
| व्यवसाय | स्वातंत्र्य सेनानी |
| धर्म | हिंदू धर्म |

यशवंतराव होळकर (प्रथम) (३ डिसेंबर १७७६, वाफगाव - २८ ऑक्टोबर, १८११, भानपुरा, मध्यप्रदेश) हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.
- काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू.
यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ च्या खर्ड्याची लढाई या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली. ह्या युद्धात यशवंतराव आपले पिता तुकोजीरावांसोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते. त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला. यशवंत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला, इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हरणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती, परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. दुसरे बाजीराव पेशवे यांच्यामुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत.
पुस्तक
[संपादन]- महाराजा-ए-हिंद : - लेखक मयुर हनुमंतराव सुळ
- 'ॲड.विजयकुमार दुधभाते किल्लारीकर'
- 'झुंज', लेखक:ना सं इनामदार
- 'महाराजा यशवंतराव होळकर', लेखक : संजय सोनवणी
- 'श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर, लेखक : नरहर रघुनाथ फाटक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |