हेन्री आठवा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आठवा हेन्री

हेन्री आठवा (इंग्लिश: Henry VIII of England) (जून २८, इ.स. १४९१ - जानेवारी २८, इ.स. १५४७) हा एप्रिल २२, इ.स. १५०९ पासुन हयात असेपर्यंत इंग्लंडाचा राजा होता. सातव्या हेन्रीचा पुत्र असलेला तो ट्युडोर घराण्यातील दुसरा राजा होता. त्याने सहा वेळा लग्न केले व या वरून रोमन चर्चशी वाद झाल्याकारणाने त्याने स्वतंत्र चर्च ऑफ इंग्लंड स्थापले व ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथाची निर्मिती केली. अनिर्बंध सत्ता उपभोगुन आठवा हेन्री ५८ व्या वर्षी मृत्यू पावला.

बाह्य दुवे[संपादन]