हरिभाऊ बागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरीभाऊ बागडे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हरिभाऊ बागडे

कार्यकाळ
इ.स. २०१४ – इ.स. २०१९
मागील दिलीप वळसे-पाटील
पुढील नाना पटोले

विधानसभा सदस्य
फुलंब्री साठी
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील कल्याण काळे

जन्म १७ ऑगस्ट १९४४
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कै. द्वारका बागडे

हरिभाऊ किसन बागडे(जन्म:१७ ऑगस्ट १९४४) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक राजकारणी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी २०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये फुलंब्री मतदारसंघामधून विजय मिळवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवली आणि तीत ते विजयी झाले. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९५ ते १९९९ दरम्यान बागडे हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते.

११ नोव्हेंबर २०१४ रोजी १३व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बागडेंची बिनविरोध निवड झाली.