Jump to content

हरिता कौर देओल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्लाइट लेफ्टनंट हरिता कौर देओल (१० नोव्हेंबर, १९७१:चंडीगढ, भारत[१] - २४ डिसेंबर, १९९६:बुक्कापुरम, आंध्र प्रदेश, भारत) भारतीय वायु दलाच्या वैमानिक होत्या. एकट्याने लढाऊ विमान उडविणाऱ्या भारतीय हवाई सेनेतील त्या पहिल्या महिला वैमानिक होत्या. त्यांनी २ सप्टेंबर, १९९४ रोजी वयाच्या २२व्या वर्षी पहिल्यांदा एव्हरो एचएस-७४८ हे विमान उडवले.[१][२][३][४]

कारकीर्द[संपादन]

देओल १९९३ साली शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) मिळविणाऱ्या सात महिला कॅडेटांपैकी एक होत्या. भारतीय वायुसेनेतील मालवाहतूक करणाऱ्या त्या पहिल्या महिला वैमानिक होत्या . हैदराबादजवळील दुंडिगुल येथील वायुसेना अकादमी मध्ये प्रारंभिक प्रशिक्षणानंतर, येलहांका वायुसेना तळावर एर लिफ्ट फोर्स ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट (एएलएफटीई) येथे त्यांना आणखी प्रशिक्षण मिळाले.

२४ डिसेंबर १९९६ रोजी वयाच्या २४व्या वर्षी नेल्लोरजवळच्या बुक्कापुरम गावाजवळ ॲव्हरो विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला[५][६][७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "All time inspirational women personalities of India". India TV. 8 March 2013.
  2. ^ Shobana Nelasco (2010). Status of Women in India. Deep & Deep Publications. pp. 13–. ISBN 978-81-8450-246-6.
  3. ^ Year Book 2009. Bright Publications. p. 559.
  4. ^ Documentation on Women, Children, and Human Rights. Sandarbhini, Library and Documentation Centre, All India Association for Christian Higher Education. 1994. p. 2.
  5. ^ Limca Book of Records. Bisleri Beverages Limited. 2003. ISBN 9788190114868.
  6. ^ India: A Reference Annual. Publications Division, Ministry of Information and Broadcasting. 1998. p. 686.
  7. ^ "Woman IAF flying cadet killed in trainer crash - Indian Express". 13 May 2008. 2014-02-13 रोजी पाहिले.