Jump to content

स्वाती (नक्षत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वाती या पानावरून पुनर्निर्देशित)
नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

स्वाती (इंग्रजीत Alpha Boötis किंवा Arcturus) हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी हे एक नक्षत्र आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात मानल्या गेलेल्या राहू या ग्रहाची ही देवता समजली गेली आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

भारतीय नक्षत्रमालिकेतील पंधरावे नक्षत्र असून याचा अंतर्भाव ⇨ तूळ राशीत होतो. या नक्षत्रात एकच तारा असून तोच त्याचा योगतारा आहे. हा संपूर्ण आकाशातील चवथ्या क्रमांकाचा आणि उत्तर खगोलार्धातील दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. पाश्चात्त्य तारका-समूहांनुसार हा तारा ⇨ भूतप तारकासमूहातील आल्फा बूटीस आहे व याला आर्टुरस ( पशुपाल वा दरवेशी ) म्हणतात. हा खगोलात होरा १४ तास १५ मिनिटे व क्रांती + १९°२७¢ येथे आहे [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति ]. सप्तर्षी ( मोठे अस्वल ) तारकासमूहातील क्रमांक ५, ६ व ७ ताऱ्यांनी बनणारी वक्र रेषा तशीच पुढे वाढविल्यास तिच्यावर स्वाती तारा दिसतो. याची कक्षा विवृत्ताकार ( लंबवर्तुळाकार ) असून एप्रिल महिन्याच्या शेवटी मध्यरात्री हा तारा याम्योत्तर वृत्तावर ( खगोलाचे दोन्ही ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक — माथ्यावरील बिंदू — यांच्यामधून जाणाऱ्या वर्तुळावर ) येतो. दृश्य ⇨ प्रत -०.०४ व निरपेक्ष प्रत ०.२५, अंतर सु. ३६.७ प्रकाशवर्षे, वर्णपटीय प्रकार KO, तेजस्वितेचा प्रकार III, पृष्ठीय तापमान सु. ४,१०० के. म्हणजे सूर्या-पेक्षा कमी, सूर्याच्या शंभरपट तेजस्वी म्हणजे दीप्ती १०० ( सूर्य = १ ), व्यास सूर्याच्या व्यासाच्या २३ पट आणि वर्तुळाचा कोनीय व्यास ०.०२० मिनिट व ⇨ पराशय ०.०९२ मिनिट असलेला हा ताम्रवर्णी महातारा आहे [⟶ तारा ]. याची निजगती ( प्रत्यक्ष गती ) सेकंदाला १२० किमी. व अरीय ( त्रिज्यीय ) गती सेकंदाला ९० किमी. आहे. याची निजगती ⇨ एडमंड हॅली यांनी १७१८ मध्ये शोधून काढली.स्वाती या नक्षत्राची देवता वायू आणि आकृती पोवळे आहे. वैदिक वाङ्मयात याला निष्ट्या म्हटले आहे. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहराची ६० वर्षांतील प्रगती साजरी करणारा समारंभ झाला; तर चाळीस वर्षानंतर १९३३ मध्ये या शहराच्या १०० वर्षांतील प्रगती साजरी करणारा समारंभ झाला. १८९३ मध्ये पहिल्या समारंभाच्या वेळी या ताऱ्या-पासून निघालेला प्रकाश १९३३ च्या दुसऱ्या समारंभाच्या वेळी तेथे ( पृथ्वीवर ) पोहोचला. हा प्रकाश विद्युत् घटावर घेऊन व त्याच्या मदतीने दिवा लावून १९३३ च्या समारंभाची नावीन्यपूर्ण सुरुवात करण्यात आली होती. परंतु हा तारा ३६.७ प्रकाशवर्षे दूर असल्याने त्यावेळी आलेला किरण प्रत्यक्षात १८९६ मध्ये त्या ताऱ्यापासून निघालेला होता.स्वाती नक्षत्रातील पावसाचा थेंब सागरामधील शिंपल्यात ( कालवात ) पडल्यास त्याचा मोती तयार होतो, अशी समजूत महाराष्ट्रात प्रचलित आहे.

             ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)