स्टेफी ग्राफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेफी ग्राफ
Steffi Graf in Hamburg 2010 (cropped).jpg
देश जर्मनी ध्वज जर्मनी
जन्म मानहाइम
शैली एकहाती फोरहॅंड, एकहाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 900–115
दुहेरी
प्रदर्शन 173–72
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.स्टेफी ग्राफ

स्टेफानी तथा स्टेफी मरिआ ग्राफ (जून १४, इ.स. १९६९, मानहाइम, जर्मनी) ही जर्मनीतील आत्तापर्यंतची सर्वात जास्त यश-कीर्ती मिळविलेली टेनिसपटू आहे.

स्पर्धात्मक यश[संपादन]

स्टेफी ग्राफने जगातील महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांंमध्ये २२ वेळा विजेतेपद पटकविले : सात वेळा विंबल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलिअन ओपन, पाच वेळा अमेरिकन ओपन. अशाप्रकारचे यश मिळवणाऱ्यांत ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट स्मिथ कौर्ट (२४ वेळ विजेती) आणि सेरेना विल्यम्स (२३ वेळ विजेती) पाठोपाठ स्टेफी ग्राफचा जगात तिसरा क्रमांक लागतो. १०७ जागतिक स्पर्धाविजेतेपदांसह (एकेरी विजेतेपद) ती मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. स्टेफीने ऑलिंपिक स्पर्धा तसेच फेडेरेशन कप (१९८७ आणि १९९२) स्पर्धांमधेही चांगली कामगिरी बजावली.

१९८८ साली स्टेफीने सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्या वर्षीच्या सेऊल ऑलिंपिकमधील टेनिसमधील महिला एकेरीचे विजेचेपद जिंकून 'गोल्डन ग्रँड स्लॅम' पूर्ण केले.

व्यक्तिगत[संपादन]

स्टेफीच्या पतीचे नाव आंद्रे अगासी आहे.