स्टेट ऑफ आर्ट (आंभोरा पूल)
भंडारा-नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध 'स्टेट ऑफ आर्ट' पूल उभारण्यात आला आहे.[१]
स्थापत्य
[संपादन]वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग यासोबतच परिसरातील पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही या पुलाचा विकास करण्यात येत आहे. कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा व कोलार या पाच नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी ठिकाणी या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सुमारे १२७.५४ कोटी रुपये खर्च करून हा पूल गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाची लांबी ७०५.२० मीटर असून १५.२६ मीटर रुंदी आहे. या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंचे फुटपाथ पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने यांच्यासह उभारण्यात येत असून ते ३.० मीटर रुंद केले आहेत.[२][३]
या पुलावर मध्यवर्ती उंचीवर एक व्ह्यूईंग गॅलरी निर्माण करण्यात आहे. सेंट्रल गॅलरी आणि पायलॉन गॅलरीसह हे गॅलरी ब्रिज आरटीएलच्या तुलनेत ४० मीटरहून अधिक उंच असून चैतन्येश्वर मंदिर परिसरासह आसपासच्या क्षेत्रातील अप्रतिम दृष्ये या पुलावरून पर्यटकांना पाहता येते. तसेच डाऊनस्ट्रीममध्ये दूर असलेल्या नदीच्या दृश्यासह संपूर्ण बॅकवॉटर जलाशय परिसर आणि टेकड्यांच्या दृष्यांचाही आनंद घेता येतो. स्काय बाल्कनीच्या मजल्याचा काही भाग पारदर्शक काचेचा बनवला जाणार आहे. पर्यटकांसाठी हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ठरनार आहे.[४]
मंजूरी
[संपादन]भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणारा श्री क्षेत्र आंभोरा येथील वैनगंगा नदीवरील पुल बांधकाम हा २०१४ मध्ये मंजूर करण्यात आला. अनेक वर्षाच्या मागणीनंतर आंभोरा नदी पूल बांधकामाला सुरुवात झाली आणि पुर्णत्वास आला आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणारा आंभोरा पुलाचे बांधकाम उत्कृष्ट स्थापत्य शैलीतून करण्यात आले आहे.
पुलाची आवश्यकता
[संपादन]आंभोरा येथील वैनगंगा नदीवर पूल नसल्यामुळे येथील जनतेला अनेक समस्याचा सामना करावा लागत होता. वैनगंगा नदीत प्रचंड जलसाठा असल्याने भंडारा जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात जायचे म्हणले तर मौदा, वेलतूर असे जवळपास ६० किमी अंतराला वडसा घालून जावे लागायचे. प्रसंगी आंभोरा देवस्थान जावे म्हणले तर बोटीने जीव मुठीत घेऊन जावे लागायचे.[५]
फायदा
[संपादन]आंभोरा पुलामुळे नागरिकांचे ६० किमी अंतर हे कमी होणार आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना भंडारा बाजारपेठेत पीक नेणे सोईचे होणार आहे आणि त्यातच आंभोरा ते पहेला येथील रोड बांधकामाला शासनाने २५ कोटीचे निधी मंजूर करून दिला. त्यामुळे भंडारा तालुक्यातील कुही तालुक्यातील मिरचीची बाजारपेठ हे सोईस्कर होणार आहे. पुलाच्या परिसरात पर्यटनस्थळाची क्षमता असल्याने आवश्यक सुविधांबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने इतर सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पुलामुळे नागपूर ते भंडारा गोंदिया ही वाहतूक सुगम व सुरळीत होऊन नागरिकांना सुविधा होईल. तसेच आंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ कमी होऊन आठ ते दहा मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे.[६]
हे सुधा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Navarashtra Marathi EPaper | Latest News | Today's Marathi News | Tajya Marathi Batmya - Navarashtra (नवराष्ट्र)". Navarashtra. 2023-01-10 रोजी पाहिले.
- ^ Jul 25, Anjaya Anparthi / TNN /; 2022; Ist, 04:43. "Ambhora cable-stayed bridge is freeboard, to remain in use even if Gosikhurd is full | Nagpur News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-01-10 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ ब्यूरो, सरकारनामा. "असा असणार आहे नितीन गडकरींनी सांगितलेला 'स्टेट ऑफ आर्ट' पूल..." Sarkarnama. 2023-01-10 रोजी पाहिले.
- ^ News, Nagpur (2022-03-04). "वैनगंगा नदीवर अंभोरा येथे 'स्टेट ऑफ आर्ट' पूल उभारणार ना. गडकरींनी केली आज पुलाची पाहणी". Nagpur Today : Nagpur News (इंग्रजी भाषेत). 2023-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Epaper Deshonnati". epaper.deshonnati.com. 2023-01-10 रोजी पाहिले.
- ^ "पूल-पर्यटन एक भन्नाट अन् विलक्षण कल्पना!". www.tarunbharat.net. 2023-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-10 रोजी पाहिले.