Jump to content

सोनी-आवळी पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आवळी ते मुख्य भूमी पर्यंत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पुलाची आवश्यकता होती. हे पूल चुलबंद नदीवर बांधण्यात येणार आहे. आवळी व सोनी गावातील नागरिकांना या पुलाची प्रतीक्षा आहे.

आवळी गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी सोनी, वडसा, लाखांदूर येथे जातात. तसेच सोनी येथील शेतकऱ्यांची शेती आवळीच्या शिवारात आहे. मात्र त्यासाठी चूलबंद नदी आडवी असल्याने पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. परिणामी शेतकऱ्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान शेतकरी व आवळी वासीयांची मागणी लक्षात घेता येथील लोकप्रतिनिधींनी सोनी-आवळी पूल मंजूर केला आहे. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे

भूमिपूजन

[संपादन]

सोनी-आवळी पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन १२ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले. या भूमिपूजनाच्या प्रसंगी सोनीचे उपसरपंच पुरुषोत्तम तलमले, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके, पंचायत समिती सदस्य सुषमा मुळे, आवळीच्या सरपंच आशा मश्राम, उपसरपंच निखिल बगमारे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कावळे, छगन दिघोरे, ईश्वर दिघोरे, अमोल राऊत, हिरा दिवठे, भूषण चित्रिव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tarun Bharat | Shri Narakesari Prakashan Limited". Tarun Bharat | Shri Narakesari Prakashan Limited (इंग्रजी भाषेत). 2023-01-13 रोजी पाहिले.