Sei Shōnagon (es); Сей Шонагон (bg); Sei Şonagon (tr); 清少納言 (zh-hk); Sei Shōnagon (sv); Sei Shōnagon (oc); 清少納言 (zh-hant); 清少纳言 (zh-cn); ເຊ ໂຊນະງນ (lo); 세이 쇼나곤 (ko); Сэй-Сёнагон (kk); Sei Shōnagon (eo); Sei Šónagon (cs); Sei Shōnagon (pap); Sei Shōnagon (fr); Sei Shonagon (cbk-zam); सेई शोनागुन (mr); Sei Shōnagon (vi); Sei Shonagon (af); Сеи Шонагон (sr); Sei Shōnagon (pt-br); 清少纳言 (zh-sg); Sey Şonaqon (az); Sei Shōnagon (en); سي شوناغون (ar); Szei Sónagon (hu); Sei Shōnagon (eu); سی شوناقون (azb); Sei Shōnagon (de); Сэй Сёнагон (be); Սեյ Շոնագոն (hy); 清少納言 (zh); სეი სიონაგონი (ka); 清少納言 (ja); سى شوناجون (arz); סיי שונגון (he); Sei Shonagon (la); Sei Shōnagon (fi); Sei Shōnagon (wa); Sei Shōnagon (it); Sei Shōnagon (et); 清少納言 (zh-tw); Sei Shōnagon (yo); 清少纳言 (zh-hans); Sei Shōnagon (pt); Sei Shōnagon (vo); Sei Shōnagon (war); Sei Shōnagon (ga); Sei Shōnagon (mwl); Sei Shōnagon (mi); Sei Shōnagon (tl); Sei Shōnagon (ca); Сей Сьонаґон (uk); Sei Shonagon (ceb); Sei Shōnagon (pl); Sei Shōnagon (cy); Sei Shonagon (nl); Sei Shonagon (ro); Sei Shonagon (sq); سی شوناگون (fa); Sei Shōnagon (id); Sei Shonagon (gl); เซ โชนะงน (th); Σέι Σόναγκον (el); Сэй-Сёнагон (ru) scrittrice giapponese (it); 平安時代中期の女流作家、歌人 (ja); autrice japonaise (fr); japansk hovdam och författare (sv); مؤرخه من اليابان (arz); japońska pisarka i dama dworu (pl); японська придворна дама, письменниця, есеїстка, поетеса (uk); Japans auteur (nl); 日本平安時代女作家 (zh-hant); Japanese author and court lady (en); Hofdame am japanischen Kaiserhof um das Jahr 1000 (de); japanilainen hovineito ja kirjailija (fi); Japanese author and court lady (en); ލިޔުންތެރިއެއް (dv); japonská básnířka a dvorní dáma (cs); Japan siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag) Sei Shonagon, Sei Shounagon (es); Sei-Shōnagon, Sei Shônagon, Sei Shonagon, Sei Shounagon (fr); Сэй Сенагон, Сэй-Сенагон, Сей Сенагон, Сэй Сёнагон, Сей Сёнагон (ru); Sei Shonagon (cy); Սեյ Սյոնագոն (hy); Sei Shonangon, Sei Şonagon, Sei Șonagon (ro); 清女, 清原諾子 (ja); Sei Shonagon, Sei Shounagon (id); Sei Shonagon, Sei Shounagon (pl); Сей Сьонагон, Сеї Сьонаґон (uk); Sei Shōnagon (nl); Sei Shonagon (fi); 세이쇼나곤 (ko); Sei Shonagon, Sei Shounagon (en); Sei Shonagon, Sei Shounagon (it); Sei Shonagon, Sei Shounagon (de); Sei Shōnagon (la)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
सेई शोनागुन (जपानी: 清少納言) इ.स. ९६६ – १०१७/१०२५) ह्या एक जपानी लेखिका व कवयित्री होत्या. यांच्या जन्म-मृत्यूची ठिकाणे अज्ञातच आहेत. जपानच्या सम्राटाच्या राजदरबारात राणी सादाको हिची ती खास सेवेकरी होती. ह्या राजदरबारातच ‘सेई शोनागुन’ हे टोपणनाव तिला मिळाले आणि ह्याच नावाने लेखिका म्हणून तिची ओळख आहे. जपानच्या इतिहासातील हेआन कालखंडात (७९४-११८५) दोन श्रेष्ठ लेखिका होऊन गेल्या. एक, ⇨ गेंजी मोनोगातारी ही कादंबरी लिहिणारी मुरासाकी शिकिबू आणि दुसरी, माकुरानो-सोशि (इं. शी. ‘द पिलो बुक’) हा लेखन संग्रह लिहिणारी सेई शोनागुन.
‘द पिलो बुक’ वाचताना सेई शोनागुन ही जन्मजात लेखिका असली पाहिजे, अशी जाणीव निर्माण व्हावी, इतक्या सहजसुंदर शैलीत तिने तिच्या भोवतालच्या जगाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया लेखनातून नोंदविल्या आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी तिच्या मनात येऊन जाणारे विचारही प्रकट केलेले आहेत. तिच्या आवडीनिवडी, तिला लक्षवेधक वाटलेली नावे, नैसर्गिक घटना, पक्षी, पर्वत हे तिच्या विचारांना पुनःपुन्हा स्पर्श करणारे विषय आहेत. ‘द पिलो बुक’चा आरंभ चार ऋतूंवर तिने लिहिलेल्या एका परिच्छेदाने होतो. प्रत्येक ऋतूचे, त्या ऋतूमधील विविध दृश्यांचे शब्दचित्र ती अशा कौशल्याने उभे करते, की तो ऋतू निर्माण करणारी भाववृत्ती तिने नेमकी पकडल्याचा अनुभव वाचकांना येतो; तथापि तिच्या लेखनसंग्रहाचा सर्वांत मोठा भाग ज्या घटना तिने प्रत्यक्ष पाहिल्या वा ज्या घटनांत तिने प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांच्या निवेदनाचा आहे. काही पारंपरिक कथा तसेच काही काल्पनिक असे प्रसंगही ह्या संग्रहात आढळतात. ह्या लेखनसंग्रहात अखेरी अखेरीस लेखिकेने आपण लिहायला कशी सुरुवात केली हे सांगून ह्या लेखनसंग्रहाच्या नावाबद्दलही सूचकतेने काही लिहिले आहे. तिची एक आठवण अशी : एकदा राणी सादाकोचा भाऊ फुजिवारानो कोरेचिका (९७३-१०१०) ह्याने राजदरबारात कागदांचा गठ्ठा आणला. राणी सादाको हिने ह्या गठ्ठ्याचे काय करायचे, असे राजदरबारातील महिलांना विचारले; तेव्हा लेखिकेने सांगितले, की त्या गठ्ठ्याची उशी करणे योग्य होईल. ह्या घटनेतून असा तर्क करता येईल, की कागदाच्या, उशीसारख्या दिसणाऱ्या गठ्ठ्याचा उपयोग करून आपले लेखन करता येईल, असे तिला वाटले असावे आणि त्यातून तिच्या लेखनसंग्रहाचे शीर्षक तयार झाले असावे.