सुचित्रा सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९५५ च्या देवदास चित्रपटात

सुचित्रा सेन (एप्रिल ६, इ.स. १९३१:पबना, बांगला देश - जानेवारी १७, इ.स. २०१४:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले.[१]

सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.

सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत.

सुचित्रा सेन यांनी भूमिका केलेले चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपटाचे नाव भाषा
१९५२ शेष कोथा बंगाली
- शारे चुआत्तोर बंगाली
- सदानंदेर मेला बंगाली
- अग्निपरीक्षा बंगाली
- गृहप्रवेश बंगाली
- अन्नपूर्णार मंदिर बंगाली
- शापमोचन बंगाली
- सांझेर प्रदीप बंगाली
- मेजो बऊ बंगाली
- सात पाके बांधा बंगाली
- दीप जले जाई बंगाली
- सप्तपदी बंगाली
१९५५ देवदास हिंदी
- मुसाफिर हिंदी
- बंबई का बाबू हिंदी
- सरहद हिंदी
१९६३ उत्तर फाल्गुनी बंगाली
१९५९ दीप जले जाई -
१९७५ आँधी हिंदी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शर्मा, विजय कौशिक, बेला रानी. विमेन्स राइट्स ॲन्ड वर्ल्ड डेव्हलपमेंट. नवी दिल्ली. p. 368.