सुचित्रा मोर्डेकर
सुचित्रा माधव मोर्डेकर (जन्म : १ मे, इ.स.१९६०) या अपंगांसाठी काम करणार्या महाराष्ट्रातील एक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या आईचे नाव सरोजिनी मोर्डेकर. सुचित्रा मोर्डेकर वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओमुळे अपंग झाल्या. तरीही धडपड करीत चिकाटीने त्या शिकत राहिल्या. कोल्हापूरमधील नूतन विद्यालय आणि गोखले काॅलेज येथे त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. नंतर त्या इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाल्या.
सुचित्रा मोर्डेकर यांची डाॅ.नसीमा हुरजूक व रजनी करकरे यांच्याशी ओळख झाली आणि तिघींनी मिळून अपंगांसाठी काम करायला सुरुवात केली. कोल्हापूरमधील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड’या संस्थेत त्या विश्वस्त सदस्य आणि शाळा विभागाच्या प्रमुख आहेत.
मैत्री आणि प्रभाव[संपादन]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
सुचित्रा मोर्डेकर, नसीमा हुरजूक आणि रजनी करकरे देशपांडे यांची ओळख अपंग पुनर्वसन संस्थेच्या एका कार्यक्रमात गायनाच्या निमित्ताने झाली. पुढे संगीताच्या माध्यमातूनच श्री.दिनकर पोवार याच्यामुळे १९७७ साली सुचित्रा मोर्डेकर आणि रजनीताई या दोघी मैत्रिणी म्हणून जवळ आल्या. आपणही नसीमा हुरजूक यांच्यासारखे अपंगांसाठी काही कार्य करावे या हेतूने दोघींनी संगीत व कला क्षेत्रात काम सुरू केले.
संगीत क्षेत्रातील वाटचाल[संपादन]
त्यांच्या अपंगत्वाचा विचार करून सुचित्राताई मोर्डेकर यांच्या आईने त्यांना संगीत शिकायला उद्युक्त केले. देवल क्लब पासून सुचित्रा मोर्डेकर यांची संगीताची वाटचाल सुरू झाली. या क्षेत्रात समाधानकारक यश संपादन करण्यासाठी त्यांना श्री.विश्वनाथ पोतदार आणि श्री.दिनकर पोवार हे गुरू लाभले. १९८२ साली एम.ए. झाल्यानंतर आलेली प्राध्यापिकाची नोकरी त्यांनी नाकारली व आकाशवाणीमध्ये संगीत क्षेत्रात काम केले तसेच खाजगी रेकॉर्डिंग्जही केली. पुढे १९९४-९५मध्ये संस्कारभारती संस्थेच्या कार्यकारिणीत त्यांना संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
पुढे त्यांनी संस्कारभारतीची तत्त्वे असणारी व अनुताई भागवत यांच्याद्वारे नामकरण झालेली कलांजली ही संस्था स्थापन केली. ही संस्था सध्याच्या पिढीला संगीत क्षेत्राकडे वळविण्याचे व ही कला जोपासण्याचे कार्य करत आहे. कलांजली मध्ये सुचित्रा मोर्डेकर या दीदी म्हणून ओळखल्या जातात. त्या हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड प्रमाणेच कलांजलीतही कार्यरत आहेत.
‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’शी संलग्न =[संपादन]
इ.स. १९९४ सालापासून हेल्पर्समध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सुचित्राताईंचा त्या संस्थेशी संपर्क वाढला आणि हळूहळू त्यारजनीताई करकरे व पी.डी. देशपांडे यांच्यामुळे त्या संस्थेशी संलग्न झाल्या. १९९६ साली घरोंदा वसतीगृहाच्या पायाभरणीसोबत सुचित्राताई ही संस्थेच्याच होऊन राहिल्या. नसीमा हुरजूक यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनीही संस्थेत काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने पाऊल टाकले. आणि २०१३ साली त्या संस्थेतील एक विश्वस्त सदस्या झाल्या. त्या संस्थेच्या शाळा विभागात कार्य करतात.
पुरस्कार[संपादन]
- सांगली येथेल संस्थेकडून अपंग मित्र पुरस्कार
- तरूण भारत वर्तमानपत्राकडून मुक्ता पुरस्कार,.
संदर्भ[संपादन]
- सुचित्रा मोर्डेकर यांच्याशी घेतलेली सविस्तर मुलाखत.
- इंटरनेट - काही मुद्दे प्राप्त करण्यासाठी.