नसीमा हुरजूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ नसीमा हुरजूक
Dr.Naseema Hurzuk.jpg
जन्म सप्टेंबर २, इ.स. १९५०
सोलापूर, महाराष्ट्र
निवासस्थान कोल्हापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी ए (अर्थशास्त्र)
पेशा सरकारी अधिकारी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९८४ पासून स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत
पुरस्कार सावित्रीबाई फुले (२००६), सह्याद्री वाहिनीचा रत्‍नशारदा पुरस्कार
संकेतस्थळ
http://www.hohk.org.in/


जन्म, बालपण आणि शिक्षण[संपादन]

डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांचा जन्म २ सप्टेंबर १९५० रोजी सोलापूर (महाराष्ट्र, भारत) येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षी पक्षाघातामुळे त्यांच्या कंबरेखालील भागाच्या सर्व संवेदना नष्ट झाल्या आणि त्यांना अपंगत्व आले. अपंगत्व येऊनही त्या खचल्या नाहीत. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन घेतली. त्यानंतर त्यांनी ‘केंद्रीय अबकारी कर’ (central excise ) या सरकारी खात्यात विभागात काही काळ नोकरी करून मग स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

सामाजिक कार्य[संपादन]

'बाबुकाका दिवाण' या आपल्या गुरूंकडून प्रेरणा घेऊन नसीमा हुजरूक यांनी ‘रजनी करकरे’ या आपल्या मैत्रिणीच्या सोबतीने अपंगांना साहाय्यभूत ठरेल अशी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर’ नावाची संस्था काढली.

हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड[संपादन]

अपंगांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देता यावी, तसेच त्यांना स्वबळावर स्वावलंबी आयुष्य जगता यावे हे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

संस्थेच्या प्रगतीचे टप्पे[संपादन]

 • १९९३ साली व्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापले
 • १९९६ साली ‘घरोंदा’ वसतिगृहाची व पुनर्वसन केंद्राची स्थापना
 • २००० साली अपंग आणि सुदृढ विध्यार्थ्यांना एकत्र शिक्षण घेता यावे यासाठी देण्याच्या उद्देशाने ‘समर्थ विद्यामंदिरा’ची स्थापना.
 • २००१ साली कुडाळ येथे काजू प्रक्रिया प्रकल्प व वसतिगृह अस्लेल्या ‘स्वप्ननगरी प्रकल्पा’ची स्थापना.

प्रभाव[संपादन]

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • चाकाची खुर्ची (आत्मकथन)[१]

पुरस्कार[संपादन]

 • १९८६ – दिल्लीच्या अपंग कल्याण फेडरेशनचा राष्ट्रीय पुरस्कार
 • १९८९-९० – कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट स्त्री उद्योजक
 • १९९८-९९ – पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून ‘बाया कर्वे’ पुरस्कार
 • २००१ - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या उद्देशाने दिला जाणारा भारत सरकारचा राष्ट्रीय स्तरावरील ‘आदर्श व्यक्ती’ पुरस्कार .
 • २००२ – कोल्हापूर-भूषण पुरस्कार

नसीमा हुरजूक यांच्या कार्याचे संदर्भ असलेली पुस्तके[संपादन]

 • खरेखुरे आयडॉल्स (लेखसंग्रह), प्रकाशक युनिक फीचर्स, २००६, संपादक सुहास कुलकर्णी, 'नसिमा हुरजूक', लेखक शिल्पा दातार-जोशी, पाने ७२ ते ७९
 • डॉटर्स ऑफ महाराष्ट्र (इंग्रजी लेखसंग्रह), प्रकाशक कालनिर्णय, १९९७, संपादक विद्या बाळ व अभिजित वर्दे
 • चाकाची खुर्ची (आत्मचरित्र), नसीमा हुरजूक

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ http://www.bookganga.com/ebooks/Books/details/5421053565303235123?BookName=Chakachi%20Khurchi