Jump to content

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिद्धार्थ गार्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
सिद्धार्थ उद्यानातील बुद्ध मुर्ती
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे (जूने) प्रवेशद्वार

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे छत्रपती संभाजीनगर मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणीपक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[]

प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[] मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.[]

वैशिष्ट्ये

[संपादन]

छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांसाठी व छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सिद्धार्थ उद्यान आणि या उद्यानाच्या परिसरात असलेले प्राणिसंग्रहाल एक आकर्षणाचा विषय व महत्त्वाचे प्रर्यटनस्थळ आहे. शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या उद्यानामध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येत असतात. उद्यानाच्या परिसरात मत्स्यालय देखील आहे, ज्यात विविध प्रजातींचे मासे आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय देखील उद्यानाच्या परिसरात आहे, त्यामध्ये मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व मुक्तिसंग्रामाचा इतिहास आहे. उद्यानात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याची व्यवस्था आहे. सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दिवसाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारांच्या घरात आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. सुटीच्या दिवशी यापेक्षा जास्त नागरिक उद्यानात येतात. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ होत असते. सिद्धार्थ उद्यानासाठी मोठ्या व्यक्तींना २० रुपये तर, लहान मुलांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्या व्यक्तींना ५० रुपये तर, लहान मुलांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यानुसार, 'या उद्यानाचे २६ एप्रिल रोजीचे उत्पन्न १ लाख २७ हजार रुपये इतके होते, तर प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न ५४ हजार रुपये होते.[][][]

बुद्ध मुर्ती

[संपादन]
सिद्धार्थ गार्डन मधील बुद्ध मुर्ती

सिद्धार्थ उद्यानाच्या आत प्रवेश केल्यानंतर समोरील बाजूस ध्यानस्त मुद्रेतील गौतम बुद्धांचा ब्राँझ धातूचा भव्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. १९ ऑगस्ट २००२ रोजी बुद्धांचा पुतळा उद्यानात उभारण्याचा संबंधीचा ठराव औरंगाबाद महानगरपालिकेने मंजूर केला होता. या बुद्ध पुतळ्याची उंची १५ फुट उंच असून तो १० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर स्थित आहे. या पुतळ्याचे वजन ३.५० टन आहे.

प्राणी संपदा

[संपादन]

डिसेंबर २०१८ नुसार, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[]

अ.क्र. प्राणी संख्या
वाघ
बिबटे
हरीण, काळवीट ४८
सांबर ४७
नीलगाय
चितळ
कोल्हे
सायाळ
तडस
१० माकड १०
११ साप १००
१२ पक्षी १९
१३ मगर

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे संग्रहालय

[संपादन]

सिद्धार्थ उद्यानामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा संग्रहालय आहे. त्यामध्ये मुक्तिसंग्रामाच्या इतिहास रेखाटलेला आहे. मुर्ती, तैलचित्रे, माहिती लेख, मराठी संस्कृतीशी निगडीत बाबी संग्रहालयातील आहेत. संग्रहालयासमोर हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ एक भव्य स्तंभ उभारलेला असून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी त्याला मानवंदना दिली जाते.[][]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा". Maharashtra Times. 2019-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-10 रोजी पाहिले.
  2. ^ "सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला". divyamarathi. 2019-01-10 रोजी पाहिले.
  3. ^ "आता तरी सुधारणा होणार का?". www.esakal.com. 2019-01-10 रोजी पाहिले.
  4. ^ a b https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/daily-siddhartha-earns-up-to-two-lakhs/articleshow/69081481.cms
  5. ^ a b https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/auravgabad-siddharth-guarden-zoo-deserted-270959
  6. ^ https://m.lokmat.com/aurangabad/third-eye-siddhartha-garden-closed/
  7. ^ औरंगाबाद, कृष्णा केंडे, एबीपी माझा. "औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बंद होणार !". ABP Majha. 2019-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]