Jump to content

सिंधुदुर्ग विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंधुदुर्ग विमानतळ
Sindhudurg Airport
आहसंवि: SDWआप्रविको: VOSR
SDW is located in महाराष्ट्र
SDW
SDW
सिंधुदुर्ग विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ सिंधुदुर्ग जिल्हा
समुद्रसपाटीपासून उंची २०३ फू / ६२ मी
गुणक (भौगोलिक) 16°00′00″N 73°32′00″E / 16.00000°N 73.53333°E / 16.00000; 73.53333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ८२०२ २,५०० डांबरी धावपट्टी

सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, चिपी-परुळे गावानजीकचे विमानतळ आहे. हे विमानतळ परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये उभारले आहे. हा विमानतळ मुंबई -गोवा महामार्गापासून २७ किलोमीटर, आणि मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २०१८ च्या उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले [] आणि ५ मार्च२०१९ रोजी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन झाले. [] ९ ऑक्टोबर २०२१ रोजी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली []

या विमानतळावर २,५०० मीटर लांबीचा रनवे असून त्यावर रुंदीने कमी असलेली एरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारखी विमाने उतरू शकतात. विमानतळाची इमारत सुमारे ४०० विमान प्रवाशांची सोय करू शकते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अलायन्स एर मुंबई

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Maharashtra's Sindhudurg Airport may begin regular operations soon! First 'test flight' to land on Sep 12". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2018-09-08. 2021-10-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Successful test flight lands at Sindhudurg Airport". pib.gov.in. 2021-10-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra CM Inaugurates Sindhudurg Airport, Flights to Mumbai Begin". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-10-10. 2021-10-12 रोजी पाहिले.