सावळदा संस्कृती
Appearance
सावळदा हे एक धुळे गाव आहे.ते तापी नदीवर आहे. सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापुर्वी सुमारे २००० - १८०० असा होता.या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याशमायुगीन लोकांचा सौराष्ट्र मधील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा
दायमाबाद येथील सावळदा संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.त्यावरील नक्षीमध्ये तीराग्रे,माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता.त्याखेरीज तांब्याच्या वस्तू,गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मणी, हाडांनपासून बनविलेले तीराग्रे ,दगडी पा - वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.त्यांच्या गाव - वसाहतीभोवती तटबंदी बांधलेली होती.त्यांची घरे मातीची असून घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या. सावळदा संस्कृतीच्या लोकांचा आणि सौराष्ट्र मधील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा संपर्क होता. धुळे जिह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू सौराष्ट्र तील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनीमयाचा पुरावा आहे.