साराभाई वर्सेस साराभाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साराभाई वर्सेस साराभाई
दूरचित्रवाहिनी * स्टार वन (भाग १)
भाषा हिंदी
प्रकार * सिटकॉम
  • विनोदी
देश भारत
निर्माता जमनादास मजेठिया

आतिश कपाडिया

दिग्दर्शक देवेन भोजानी

आतिश कपाडिया

निर्मिती संस्था हॅट्स ऑफ प्रॉडक्शन
कलाकार सतीश शहा, रत्ना पाठक शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली आणि राजेश कुमार
प्रसारण माहिती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

साराभाई वर्सेस साराभाई (इंग्रजी: Sarabhai vs Sarabhai) ही एक सिटकॉम प्रकारातील एक विनोदी मालिका आहे. ही मालिका १ नोव्हेंबर २००४ ते ११ सप्टेंबर २००६ दरम्यान स्टार वन या हिंदी वाहिनीवर आणि १५ मे २०१७ ते १७ जुलै २०१७ या कालावधीत हॉटस्टारवर दोन हंगामांसाठी चालली.

देवेन भोजानी दिग्दर्शित ही मालिका जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. सतीश शहा, रत्ना पाठक शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली आणि राजेश कुमार यांच्या प्रमुख भूमिका असून मालिकेची कथा मुंबईच्या कफ परेडमध्ये राहणाऱ्या एका उच्चवर्गीय कुटुंबाभोवती फिरते.

हॅट्स ऑफ प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली होती. तिची संकल्पना आणि लेखन त्याच्या पिढीच्या पुढे असल्याचे मानले जाते आणि त्याच्या सुरुवातीच्या रिलीजच्या वेळी सरासरी दर्शक रेटिंग मिळाले. गेल्या काही वर्षांत हा कार्यक्रम एक कल्ट क्लासिक बनला आहे.

थोडक्यात माहिती[संपादन]

हा कार्यक्रम एका उच्चवर्गीय गुजराती कुटुंबाच्या जीवनाभोवती फिरतो. साराभाई हे दक्षिण मुंबईतील अपमार्केट कफ परेड भागात आलिशान इमारतीत आणि नंतर पेंटहाऊसमध्ये राहतात. माया साराभाई आणि इंद्रवदन साराभाई यांचे हे घर असून यांच्या कुटुंबात तीन मुले आहेत.

सर्वात मोठा साहिल आहे जो माया आणि इंद्रवदनच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये त्याची मध्यमवर्गीय पत्नी मोनिशासोबत राहतो. साहिल हा कॉस्मेटोलॉजी डॉक्टर आहे आणि इतर पात्रांच्या तुलनेत तो अतिशय संयोजित आहे. मोनिशाच्या मध्यमवर्गीय सवयी मायाला त्रास देतात, कारण माया ही एक स्नूटी आणि स्नोबिश सोशलाइट आहे. माया सतत तिला अतिशय विनोदी पद्धतीने टोमणे मारत असते आणि तिचे मार्ग सुधारण्याचा प्रयत्न करते. परंतु मोनिषा तशीच राहते.

माया आणि इंद्रवदन यांचा मुलगी सोनिया (इंग्रजी: Sonya) एक psychic आहे. तिचे लग्न दुष्यंतशी झाले आहे, जो एक तंत्रज्ञ आहे. तो नेहमी यंत्रांबद्दल सर्व काही सांगून सगळ्यांना वैताग देत असतो. "I'll explain" (अर्थ: "मी समजावून सांगेन") असा त्याचा कॅचफ्रेज आहे.

सर्वात धाकटा मुलगा, रोसेश, हा एक कवी आणि अभिनेता आहे. त्याच्या कविता मालिकेतील महत्त्वाचा विनोदाचा स्रोत आहेत. इंद्रवदनला रोझेशचा छळ करायला आवडते. तो त्याच्या कवितेला टोमणा मारत असतो. रोसेश त्याच्या "मॉम्मा"ची एक कठपुतली आहे, तो मायाची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. तो अविवाहित असून आई-वडिलांसोबत राहतो.

कुटुंबातील इतर पात्रांमध्ये इंद्रवदनची बहीण इला आणि तिचा बहिरा पती मधुसूदन यांचा समावेश होतो. मधुसूदनची कॅचफ्रेज आहे, "हैं?" त्याला ऐकायला कमी येते. सतत "हैं? हैं?" करून तो इंद्रवदनला प्रचंड त्रास देत असतो.

साराभाईंच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांमध्ये कॉमेडी आणि संघर्ष निर्माण होतो. मालिकेतील बहुतांश विनोद हा शहरातील उच्चभ्रू लोकांमधील उथळ संवाद आणि मध्यमवर्गीय समाजातील उणीवा आणि अपयशांबद्दलच्या त्यांच्या कल्पनांमधून प्राप्त झाला आहे. या मालिकेचा दर्जा एवढा आहे की सर्व भारतीय सिटकॉममध्ये याला कल्ट क्लासिक मानला जाते.[१]

भूमिका[संपादन]

प्रसारण[संपादन]

मालिकेचा पहिला भाग २००४ ते २००६ दरम्यान स्टार वन वर प्रसारित झाला. या मालिकेचे पुनःप्रसारण स्टार उत्सव वाहिनीवर देखील प्रसारित झाले.[२] दुसरा भाग डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर १५ मे २०१७ ते १७ जुलै २०१७ या कालावधीत रिलीज झाला.[३] या मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी खूप मोठ्या प्रमाणात विनंती करण्यात आली होती. कारण या मालिकेने अनेक वर्षांमध्ये अनेक वेळा प्रसारित होऊन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. हा कार्यक्रम ६ एप्रिल २०२० पासून स्टार भारत वर प्रसारित करण्यात आला, कारण कोविड-१९ साथीमुळे चॅनलला चालू असलेल्या मालिकांची निर्मिती थांबवावी लागली.[४]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Lunching with the Sarabhais!". www.rediff.com. 2022-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "IT".
  3. ^ "EXCLUSIVE: Sarabhai vs Sarabhai Take 2 cast opens up about the new season; makers hint Khichdi might return as a web series". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.
  4. ^ "Sarabhai Vs Sarabhai and Khichdi are the latest shows to return on TV". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.