रत्ना पाठक
रत्ना पाठक शाह | |
---|---|
रत्ना पाठक शाह | |
जन्म |
रत्ना पाठक १८ मार्च १९५७ बॉम्बे, ब्रिटिश भारत |
निवासस्थान | मुंबई |
नागरिकत्व | भारतीय |
कारकिर्दीचा काळ | १९८३- सद्य |
प्रसिद्ध कामे | साराभाई वर्सेस साराभाई मालिका |
ख्याती | माया साराभाईची भूमिका |
जोडीदार | नसुरूद्दीन शाह |
अपत्ये |
|
नातेवाईक |
|
रत्ना पाठक शाह ( १८ मार्च १९५७) या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्या हिंदी थिएटर, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमधील कामांसाठी ओळखल्या जातात. रंगभूमीवरील त्यांच्या विस्तृत कार्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेतील नाटकांच्या मालिकांचा समावेश आहे. १९८० च्या दशकात त्या प्रसिद्ध टीव्ही मालिका इधर उधर मधील त्यांच्या भूमिकेनंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या.[१]
सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004-2006) मधील माया साराभाई या स्नॉबिश सोशलाईटच्या भूमिकेने त्यांना प्रचंड ओळख आणि प्रसिद्धी दिली. त्यांच्या इतर प्रमुख भूमिकांमध्ये चित्रपट जाने तू या जानेना (2008), अॅक्शन कॉमेडी चित्रपट गोलमाल 3 (2010), फॅमिली थरारपट कपूर अँड सन्स (2016), बुरखा (2017), आणि ब्लॅक-कॉमेडी चित्रपट लिपस्टिक अंडर माय यांचा समावेश आहे. या सर्वांनी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. त्या रोमँटिक कॉमेडी एक मै और एक तू (2012) आणि कॉमेडी-ड्रामा खूबसूरत (2014) मध्ये देखील दिसल्या. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्याशी त्यांनी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना दोन मुले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Idhar Udhar, the Hindi sitcom we desperately need today". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2019-12-01. 2022-01-25 रोजी पाहिले.