Jump to content

आतिश कपाडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आतीश कपाडिया
जन्म आतीश कपाडिया
गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र
 • लेखक
 • अभिनेता
 • दिग्दर्शक
 • निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८७- चालू
भाषा
 • गुजराती
 • हिंदी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम साराभाई वर्सेस साराभाई, खिचडी

आतिश कपाडिया हे एक भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. साराभाई वर्सेस साराभाई (२००४) आणि खिचडी (२००२) या मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या आणि दोन्हींनी कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला.[१][२]

ते प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करतात. त्यांनी “हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स” नावाची एक निर्मिती कंपनी सुरू केली. २००३ मध्ये साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट संवाद म्हणून आतिश यांना इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार मिळाला.[३][४]

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

आतीश यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या घरचा कापडांचा व्यवसाय असल्याने "कपाडिया" आडनाव त्यांना मिळाले. वडिलांकडून प्रेरणा घेऊन आतीश वाचन करू लागले. हळूहळू ते लेखनाबरोबर अभिनयही करू लागले.त्यांनी सुरुवातीला गुजराती नाटकांमध्ये काम केले.[५]

कारकीर्द[संपादन]

१. चित्रपट

 • १९९९- मन- पटकथा लेखक, संवाद लेखक
 • २०००- जोश- संवाद लेखक
 • २००५- वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम- पटकथा लेखक
 • २०१०- अॅक्शन रिप्ले- पटकथा लेखक,संवाद लेखक
 • २०१०- खिचडी: द मूव्ही- अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, कार्यकारी निर्माता, सह-निर्माता
 • २०१७- कमांडो २- गीतलेखन


२. दूरचित्रवाणी


आतीश कपाडिया यांनी गुजराती नाटकांमध्ये सुरुवातीला काम करायला सुरुवात केली. त्यानंतर गुजराती मालिकांसाठी ते पटकथा लिहू लागले. "अल्पविराम" या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेने त्यांना मोठे काम दिले. यानंतर हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वाच्या आणि लोकप्रिय कार्यक्रम तयार केले.[६]

साराभाई वर्सेस साराभाई आणि खिचडी या मालिकांचे ते दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या. या मालिकांनी त्यांना व्यापक ओळख दिली.[७]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Sarabhai Vs Sarabhai: Writer Aatish Kapadia Says Characters Inspired By His Family". NDTV.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
 2. ^ "Supriya Pathak And Team Khichdi Meet PM Modi. See Pic". NDTV.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
 3. ^ "IndianTelevisionAcademy.com". web.archive.org. 2012-05-26. 2012-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-31 रोजी पाहिले.
 4. ^ "Telly Awards". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-31 रोजी पाहिले.
 5. ^ https://plus.google.com/107324234873078450867 (2003-01-03). ""Life is not a rat race" : Aatish Kapadia". Indian Television Dot Com (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.
 6. ^ https://plus.google.com/107324234873078450867 (2003-01-03). ""Life is not a rat race" : Aatish Kapadia". Indian Television Dot Com (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.
 7. ^ "Sarabhai vs Sarabhai writer Aatish Kapadia miffed with the show's Pakistani remake; Calls it 'A cringy watch' | PINKVILLA". www.pinkvilla.com. 2022-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-01 रोजी पाहिले.