Jump to content

सदस्य चर्चा:रुस्तुम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत रुस्तुम, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन रुस्तुम, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५१ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १९:४१, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

आपल्या शंका - भाग १

[संपादन]

विकिपीडियातील एंट्री लेव्हल सोप्यात सोप्पी असणे अभिप्रेत असते त्यामुळे त्या संदर्भाने पहिली दहा संपादने काही चुकेल का कुणी काही म्हणेल का याचा विचार न करता करावीत. खरे मार्गदर्शन पहिल्या दहा संपदनांनतरच चालू होऊ शकते.

>>मी श्रीनिवास हेमाडे यांचा जुना चाहता आहे, त्यांचे लेख मी वाचतो. त्यांची नोंद मी करू शकतो का ?<<
आपल्या प्रश्नाचा अर्थ बहुधा आपणास मराठी विकिपीडियावर श्रीनिवास हेमाडे नावाचा व्यक्तीपर लेख लिहावयाचा असे आहे का ? तसे असेल तर उत्तर "काही ज्ञानकोशीय संकेत-अटींसकट" होकारार्थी आहे. खालील प्रक्रीया सुरवातीस कदाचित क्लिष्ट वाटेल पण काळाच्या ओघात सवय होईल तसेच महत्व आपसुकच कळत जाइल.
(अर्थात) माझा व्यक्तीगत सल्ला सुरवातीस मराठी तत्त्ववेत्ते अथवा अथवा तत्त्वज्ञानाचे मराठी प्राध्यापक असा काहीसा घेऊन त्यात ==श्रीनिवास हेमाडे== असा विभाग करावा माहिती दोन परिच्छेदांपेक्षा अधिक झाली तर स्वतंत्र लेखात स्थानांतरीत करावी. अर्थात मराठी विकिपीडियावर लेखन सहसा संदर्भ असलेले, समसमीक्षीत अथवा त्रयस्थ दुजोरा असलेले हवे; आता या संकेत अटीत न सामावणारी काही माहिती आपल्याकडे श्रीनिवास हेमाडेंकडे सरळ मागूनही मिळू शकेल पण या तीन पैकी (संदर्भ असलेले, समसमीक्षीत अथवा त्रयस्थ दुजोरा) किमान एक साधण्याच्या दृष्टीने एखाद्या मराठी संस्थळावर जिथे प्रतिसाद दिले जाऊ शकतात, तुम्ही दिलेल्या माहितीची चिकित्सा अथवा समिक्षीण होऊ शकते अशा ठिकाणी लेख लिहून काही काळानंतर विश्वासार्ह माहिती साक्षेपी स्वरुपात आपण संबंधीत लेख विभागात अथवा लेखात स्थानांतरीत करू शकता. (किंवा व्यक्ती चित्रण विषयक लेखनात रुची असेल तर मराठी विकिपीडियात आणि आंतरजालावर सध्या काय माहिती नाही अशी व्यक्ती चरित्रपर ग्रंथ लेखन करून प्रकाशित करणे हा एक प्रगत स्तर असू शकेल.)


  1. व्यक्ती आणि लेखन विषयक निरीक्षणे नसलेली वस्तुनिष्ठ माहिती जसे की जन्मतारीख कुठे कुठे कामा केले, प्रसिद्ध पुस्तके/लेखन इत्यादी त्यांच्या इतरत्र प्रकाशित आत्मपर लेखनातून घेता येऊ शकेल.
  2. व्यक्ती आणि लेखन विषयक निरीक्षणे असलेली माहिती मात्र सहसा आत्मपर लेखनातून न येता त्रयस्थ म्हणजे की जसे की तुम्ही स्वत: त्यांच्या विषयी इतरत्र प्रकाशित केलेल्या लेखनातून अथवा मुलाखतीतून संदर्भ देऊन घेता येऊ शकेल. (एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आत्मपर लेखनातून घेण्याशिवाय अगदी पर्यायच न राहिल्यास शक्यतोवर तसा स्पष्ट निर्देश करावा.)
  3. इतर संकेत लेखन अटीत श्रीनिवास हेमाडे मराठी विकिपीडियाचे सन्मानीय सदस्य सुद्धा आहेत, तरी सुद्धा ते स्वत:बद्दल मराठी विकिपीडियातील लेख नामविश्वात लेखन करु शकणार नाहीत अथवा त्यांच्या बद्दल असेच लिहा असे (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष) सांगू शकणार नाहीत. असे का ?
  4. ते त्यांचे स्वत:चे छायाचित्र उपलब्ध करुन देऊ शकतात.
  5. वस्तुनिष्ठ नसलेली आणि संदर्भांचा अभाव असलेली माहीती खासकरून काही कारणाने कायदेविषयक दृष्टीकोनातून बदनामी कारक असल्यास वगळण्यासाठी आग्रह धरू शकतात. (हे अधिकार त्यांना मराठी विकिपीडियाचे सदस्य म्हणून नव्हे तर कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्राप्त होतात)
  6. त्यांच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखनाचे वाचनकरून त्यांचे मुद्दे मराठी विकिपीडियातील लेखातून तुमच्या स्वत:च्या शब्दात संदर्भासहीत मांडण्यास कोणतीही अडकाठी नाही; मात्र मराठी विकिपीडियात त्यांचे इतरत्रचे विशीष्ट लेखन त्यांच्या लेखी प्रताधिकारमुक्ती अनुमती शिवाय जसेच्या तसे कॉपीपेस्ट करू नये.


धन्यवाद, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१७, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

आपल्या शंका भाग २

[संपादन]
  • वर्ग:व्यक्ती हे मराठी विकिपीडियातील व्यक्ती विषयक लेखांचे सर्व्वोच्च वर्गीकरण आहे. सध्या उपलब्ध व्यक्ती विषयक लेखांचा शोध आपण शोध खिडकीतून अथवा वर्ग:व्यक्ती येथून करता येते.
व्यक्ती विषयक लेखात लिहिताना लेखाच्या शेवटी व्यक्तीवर /कार्यावर टिका झालेली असल्यास त्याची संदर्भा सहीत उचित दखल तटस्थपणे घेणे त्याच वेळी संदर्भ उपलब्ध नसलेली व्यक्तीबद्दलचा बदनामीकारक मजकुर टाळण्याची काळजी असा दुहेरी समतोल पाळणे अभिप्रेत असते.
मॅनेजमेंट आणि अकाऊंटन्सी विषयावर आवर्जून लेखन करावे.
काही शंका आल्यास असे मनमोकळे पणाने विचाराव्यात.


धन्यवाद, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !!
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३०, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]