सदस्य चर्चा:रश्मी सावंत
स्वागत | रश्मी सावंत, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | रश्मी सावंत, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून सरावला नाहीत ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) १२:३६, २७ ऑगस्ट २०१२ (IST)
मदत
[संपादन]नमस्ते,
आपल्याला कोणत्या कामा साठी मदत हवी आहे ते कळवावे. सुरुवातीस आपण येथे थोडे वाचन केल्यास प्रारंभिक माहिती मिळेल.
आपल्याला मदत करण्यास तत्पर - Nankjee (चर्चा) १३:१९, २७ ऑगस्ट २०१२ (IST)
लक्ष्मण ढोबळे मंत्री राष्ट्रवादी बद्दल माहिती कुठे आणि कशी लिहावी ?
नमस्कार
[संपादन]नमस्कार रश्मी,
संयुक्त महाराष्ट्र चळवळ संबंधित लेखांतील योगदानाबद्दल आपले आभार.
खालील काही गोष्टींची आपल्याला मदत होऊ शकेल.
- लेखाच्या शेवटी [[वर्ग:<वर्गाचे नाव>]] असे लिहून लेखांचे वर्गीकरण करता येते.
- विकिपीडियावर Original Research टाकू नये. अधिक माहिती इथे मिळेल.
- आपले तोडा फोडा आणि झोडा निती (राजकारण) व आर्थिक विकास (समाजसेवक आणि राजकारणी लोकांचा) हे Original Research आहेत असे वाटते.
- लहान विभागांवर नवीन लेख बनविण्याऐवजी ते उपलब्ध लेखांत टाकावेत.
- उदा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाचे ग्रंथ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ या लेखातील एक भाग बनू शकतो.
- आपण इतर लेख बघून त्यानुसार बदल करू शकता. मीसुद्धा अनेक नवीन गोष्टी अशाच शिकलो.
- काही मदत हवी असेल तर चावडीवर विचारा.
आपली संपादने अशीच चालू रहावीत ही अपेक्षा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०४:३८, ४ सप्टेंबर २०१२ (IST)
नमस्कार क्षितिज सर आपल्या मार्गदर्शना बद्दल अभारी आहे. वर्गीकरण करून पहाते पण नेमका कोणता वर्ग वापरावा या बद्दलही मार्गदर्शन मिळाले तर आवडेल, जसे मधुकर सामंत यांचे वर्गीकरण कोणत्या गटात करावे सध्या कोणती वर्गीकरणे उपलब्ध आहेत हे अद्याप उमगले नाही . Original Research बद्दल आपण दिलेल्या लिंकचा अभ्यास करते आणि एक दोन दिवसात शिकण्याचा प्रयत्न करते.संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीचा आवाका मोठा आहे. तो नेमका एका लेखात मावेल का या बद्दल शंका वाटते. मी तयार केलेले लहान लेख नक्कीच मोठे करेन.
- मधुकर सामंत लेखाचे मी वर्गीकरण केले आहे.
- वर्गीकरणामुळे लेख हुडकणे सोपे होते.
- सामान्यतः संबंधित सर्व वर्गात लेखाचे वर्गीकरण करावे.
- क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:४४, ५ सप्टेंबर २०१२ (IST)
" नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात, मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले." असे यशवंतराव म्हणाले हि त्यांच्या अधिकृत भूमीकेचा भाग होती ह्या वस्तुस्थिती बद्दल आपणास आणि पळसकर सरांना का आक्षेप असावा हे समजले नाही. पळसकर सरांनी आक्षेप घेतलेल्या काही वाक्य रचना बदलता येतील पण तटस्थ सखोल अभ्यास केल्यास त्या तथ्या पासून फार दूर आहेत असेही नाही.त्या दृष्टीने विवीध लेखातून येत्या काळात माझ्या प्राध्यापक मित्रांच्या मार्गदर्शनाखाली मी मांडणी करेन.
- इंटरनेटवर शोध घेता "इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. या वाक्याकरताचेही संदर्भ आढळले पण हे वाक्य दोन संबधीत वाक्यांच्या मध्ये घुसडेले गेले असावे अंदाज बांधता येऊ शकतो.वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.[१] आणि त्यानंतर १५ दिवसांनी मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलनात हे सोबत असावयास हवे असावे.
१९४०च्या संयुक्त महाराष्ट्र सभेच्या प्रवर्तकात ग.त्र्यं. माडखोलकरांचा समावेश होताच. १९३८ रोजी पटवर्धन उल्लेखास संदर्भ असला तरी उल्लेख एका अर्थाने अपूर्ण आहे कारण संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीच्या समर्थकात पटवर्धन आडनावाच्या किमान तीन व्यक्ती आढळतात डॉ. शिवाजीराव पटवर्धन ,ग. वि. पटवर्धन आणि तीसरे अच्यूतराव पटवर्धन तर प्रश्न एवढाच आहे कि इथे नेमक्या कोणत्या पटवर्धनांचा उलेख आहे.माझे मित्र प्राध्यापक याचा अधिक शोध घेत आहेत.
१९२७-२८ साली महाराष्ट्र एकीकरणाचा प्रश्न भाषावार प्रांत रचनेच्या निमीत्ताने मोतीलाल नेहरूंसमोर मांडला गेला होता ती मंडळी नेमकी कोण कोण याचाही शोध घेत आहोत .
- त्याबद्दल माझे ज्ञान खूप कमी आहे.
- मला फक्त वाटते की खूप अलंकारिक/व्यक्तिसापेक्ष भाषा असू नये.
- उदा. " खरपूस समाचार", "मुक्ताफळं उधळली".
- क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:४४, ५ सप्टेंबर २०१२ (IST)
पुन्हा एकदा थॅंक्यु - रश्मी.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.