इक्ष्वाकु कुळ
(श्रीरामाचे पूर्वज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भारतीय महकाव्यांमध्ये उल्लेखित, इक्ष्वाकु कूळ हे राजा इक्ष्वाकुपासून सुरू झालेले वैदिक काळातील आर्य राजघराणे होते. ह्या घराण्यालाच सूर्यवंश म्हणून देखील ओळखले जाते. ह्यामध्ये क्षत्रिय वर्णातील महत्त्वाच्या वंशावळींचा समावेश होतो. जैन संदर्भानुसार,प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि इतर 22 तीर्थंकर ह्याच कुळात जन्मले.बौद्ध साहित्य आणि परंपरानुसार,गौतम बुद्धदेखील ह्याच कुळात अवतरित झाले होते. भारतीय उपखंडातील नंतरच्या अनेक राजांनी ह्या कुळाची पार्श्वभूमी असल्याचा दावा केला होता. ह्या कुळात भगीरथ,दशरथ,राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.