श्रीकांत बोला
श्रीकांत बोला | |
---|---|
जन्म |
७ जुलै, १९९२ सीतारामपुरम, मछलीपट्टणम, आंध्र प्रदेश |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | इंजिनिअरिंग |
प्रशिक्षणसंस्था | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी |
पेशा | उद्योजक |
मालक | बोलंट इंडस्ट्रीज |
वडील | दामोदर राव |
आई | वेंकट अम्मा |
श्रीकांत बोला (लेखन भेद: बोल्ला) (७ जुलै, १९९२) हे भारतीय उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मेंदू आणि संज्ञानात्मक विज्ञान आणि व्यवसायातील तो पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी आहे.[१][२][३]
प्रारंभिक जीवन
[संपादन]बोल्ला यांचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथील 'सीतारामपुरम' येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. बोल्ला हे दामोदर राव आणि वेंकट अम्मा या जोडप्याच्या पोटी दृष्टिहीन म्हणून जन्माला आले होते.[४][५] मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घायचे ठरवले. परंतु ते दृष्टिहीन असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. बोल्ला यांनी खटला दाखल केला आणि सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर १२ वी विज्ञान शिकण्याची परवानगी मिळाली. बोल्लाने तेव्हा बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९८% गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांक पटकावला.[६] त्या नंतर परत यांना बोल्लाला भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय आय टी) मध्ये केवळ दृष्टिहीन असल्याने प्रवेश नाकारण्यात आला.[७] त्यांनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले, जेथे ते पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी होते. अमेरिकेत त्यांना मोठ्या कॉर्पोरेट संधी आल्या होत्या, पण भारतात काहीतरी वेगळे नाविन्यपूर्ण करण्यासाठी त्यांनी तेथे नकार दिला.[८][९]
इ.स. २००५ पासून ते युवा नेते होते. त्यानंतर ते 'लीड इंडिया २०२०: द सेकंड नॅशनल युथ मूव्हमेंट'चे सदस्य बनले.[१०] भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'लीड इंडिया २०२०'ची स्थापना केली होती. यात भारताला २०२० पर्यंत गरीबी, निरक्षरता आणि बेरोजगारीचे निर्मूलन करून विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय गाठण्यात मदत करणे असे उद्दिष्ट होते.[११]
कारकीर्द
[संपादन]बोल्ला यांनी २०११ मध्ये 'समनवाई सेंटर फॉर चिल्ड्रेन विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज'ची सह-स्थापना केली, ज्यामध्ये त्यांनी ब्रेल प्रिंटिंग प्रेस सुरू केली.[१२] येथे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वयं-शाश्वत जीवनासाठी एकाधिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक, पुनर्वसन करण्यात येते.[१३]
२०१२ मध्ये, बोल्ला यांनी 'बोलंट इंडस्ट्रीज' सुरू केली, जी अरेका आधारित उत्पादने बनवते आणि रतन टाटा यांच्या निधीतून शेकडो अपंग लोकांना रोजगार देते.[५] रोजगार, आर्थिक आणि पर्यावरण - समस्यांचे संयोजन करून, बोलंट इंडस्ट्रीज महानगरपालिकेच्या कचरा किंवा रद्दी कागदापासून पर्यावरणास अनुकूल क्राफ्ट पेपर निर्माण करणे, पुनर्नवीनीकरण केलेल्या कागदापासून पॅकेजिंग उत्पादने बनवणे, वनस्पतींच्या पानांपासून डिस्पोजेबल उत्पादने आणि पुनर्नवीनीकरण कागद निर्माण करणे तसेच भंगार मधील प्लास्टिकचे पुनर्वापर करणे आदित्यादी कार्ये करत असते. बोलंटने सुरुवातीपासून महिन्याला सरासरी २०% वाढ दर्शविली आहे आणि २०१८ मध्ये १५० कोटीची उलाढाल केली आहे.[१४][१५]
श्रीकांत हे सप्टेंबर २०१६ मध्ये स्थापन झालेल्या 'सर्ज इम्पॅक्ट फाउंडेशन'चे संचालक देखील आहेत.[१६] भारतातील व्यक्ती आणि संस्थांना २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सक्षम करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.[१७]
एप्रिल २०१७ मध्ये, बोल्लाचे नाव फोर्ब्स मासिकाने संपूर्ण आशियातील ३० वर्षाखालील ३० व्यक्तींच्याच्या यादीत नोंदवले आहे, त्या यादीतील एकूण तीन भारतीयांपैकी बोला एक आहेत.[१८]
उपलब्धी
[संपादन]- प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार
- तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटी ऑफ न्यू जर्सी तर्फे युवा उत्कृष्टता पुरस्कार.[१९]
- एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर पुरस्कार २०१५ मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योजक.[२०]
- SME मधील उदयोन्मुख विजेते - प्राइड ऑफ तेलेगाना पुरस्कार २०१८.[२१]
- बिझनेस लाइन यंग चेंज मेकर अवॉर्ड २०१८.[२२]
- ECLIF मलेशिया द्वारे उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार - २०१६[२३]
- CII द्वारे वर्षातील उदयोन्मुख उद्योजक - २०१६.[२३]
- ९३व्या इंडिया सायन्स काँग्रेसमध्ये दुसरे स्थान.[२४]
- वन यंग वर्ल्ड द्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योजक - २०१९.[२५]
- TV9 - २०१९ तर्फे नवनक्षत्र सन्मान पुरस्कार
यंग ग्लोबल लीडर्स २०२१
चित्रपट
[संपादन]२०२२ साली भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधि परमार हीरानंदानी यांनी बोलाच्या जीवनावर एक चरित्रपट निर्माण करण्याची घोषणा केली. या चित्रपटात बोलाची भूमिका अभिनेते राजकुमार राव यांनी निभावली असून याचे दिग्दर्शक तुषार हीरानंदानी आहेत.[१][३] हा चित्रपट १० मे २०२४ रोजी श्रीकांत नावाने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Rajkummar Rao to play visually-impaired industrialist Srikanth Bolla in a biopic". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ११ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Srikanth Bolla '13 proves that anyone can learn how to swim". MIT News. 2020-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-10 रोजी पाहिले.
- ^ a b "Srikanth Bolla Biopic : कौन हैं 29 वर्षीय श्रीकांत बोला, जिनकी बायोपिक के लिए राजकुमार राव ने भरी है हामी?". tv9hindi.com. 2022-01-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १० जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Meet Srikanth Bolla: Denied the IIT dream due to blindness but built a multi-crore business". dnaindia.com. ११ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b Kumar, V Rishi (15 February 2016). "Bollant Industries now gets Ratan Tata's backing". The Hindu Business Line. 8 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "The blind CEO who built a 50 crore company". Rediff.com. 22 December 2015. 8 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Blind student Srikant Bolla, rejected by IIT, gets admission to MIT Sloan School & is now an entrepreneur!". India.com. 18 December 2015. 8 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Inspired to help others". MIT News. 8 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Living His Dream". MIT Spectrum. 8 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "After Being Rejected By IIT, This Blind Man Went On To Become The CEO Of A Company Worth Crores". www.mensxp.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Lead India". leadindia2020.org. 2019-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 February 2019 रोजी पाहिले.
- ^ Kumar, V. Rishi. "A catalyst for change". @businessline (इंग्रजी भाषेत). 21 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "World was blind to see tech entrepreneur Srikanth Bolla's vision, but he had other ideas". dna (इंग्रजी भाषेत). 4 August 2018. 22 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Refused by IIT, This Blind Man Went on to Become an MIT Grad and CEO of a Rs 50 Crore Company". The Better India (इंग्रजी भाषेत). 8 April 2016. 25 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "He winked at the world when it failed to see his vision - Times of India". The Times of India. 22 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Surge Impact I About us". Surge Impact (इंग्रजी भाषेत). 2019-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Surge Impact - Accelerating social impact in India". Surge Impact (इंग्रजी भाषेत). 2022-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Srikanth Bolla". Forbes (इंग्रजी भाषेत). 27 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Srikanth Bolla" (इंग्रजी भाषेत). 2021-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "NDTV confers Indian of the Year Award 2015". 30 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Winners". prideoftelangana.com. 2019-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "BL Changemaker Award Winners". @businessline (इंग्रजी भाषेत). 4 March 2019 रोजी पाहिले.
- ^ a b Kumar, V. Rishi. "A catalyst for change". @businessline (इंग्रजी भाषेत). 4 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "How a blind man from India got into MIT and launched a US$16 million start-up". AsiaOne. 17 December 2016. 4 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "One Young World Announces 2019 Winners of Entrepreneur of the Year Award". One Young World (इंग्रजी भाषेत). 19 June 2019. 26 November 2019 रोजी पाहिले.