श्रवणबेळगोळ
श्रवणबेळगोळ (कन्नड: ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳ ; इंग्रजी: Śravaṇa Beḷgoḷa) हे कर्नाटकाच्या हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे जैन धर्मीयांचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे प्रसिद्ध आहे [१].
स्थान
[संपादन]श्रवणबेळगोळ हाळेबीडूपासून ७८ कि.मी., बेलुरापासून ८९ कि.मी., मैसूर शहरापासून ८३ कि.मी. आणि बंगळूर शहरापासून १५७ कि.मी. अंतरावर आहे.
बाहुबली गोम्मटेश्वराची मूर्ती
[संपादन]श्रवणबेळगोळाजवळील विंध्यगिरी पर्वतावर बाहुबली गोम्मटेश्वराची ५७ फूट उंचीची मूर्ती अखंड पाषाणातून कोरली आहे. बाहुबली गोम्मटेश्वर जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, अर्थात आदिनाथ यांचा दुसरा पुत्र होता. गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने इ.स. ९७८ ते इ.स. ९९३ या कालखंडात ही मूर्ती घडवून घेतली. ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेल्या मूर्तींपैकी जगातील सर्वात उंच मूर्ती आहे असे मानले जाते [ संदर्भ हवा ]. हे स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या मूर्तीचे अंदाजे वजन ४०० ते ६०० टन आहे.
बाहुबली गोम्मटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठी, कन्नड भाषांतील शिलालेख आहेत. ज्ञात पुराव्यांनुसार येथील मराठी शिलालेख लिखित मराठीच्या इतिहासातील सर्वांत जुना मजकूर आहे[ संदर्भ हवा ]. मूर्तीच्या चोहो बाजूंनी २४ जैन तीर्थंकरांची छोटी मंदिरे आहेत. मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विंध्यगिरी पर्वतावर ६५० पायऱ्या खोदल्या आहेत [२].
दर १२ वर्षांनी मूर्तीची महामस्तकाभिषेक पूजा करण्यात येते. लाखो जैन भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. मूर्तीवर दूध, दही, तूप, हळद यांचा अभिषेक केला जातो. [३].
चंद्रगिरी पर्वत
[संपादन]चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्याची समाधी आहे. समाधीसोबत अनेक मंडप व जैन बसदी आहेत. पर्वतावर कन्नड भाषेतील बरेच शिलालेख आहेत.
चित्रदालन
[संपादन]-
पद
-
विंध्यगिरीवरून दिसणारा चंद्रगिरी पर्वत, कल्याणी तलाव, व भाविक पायऱ्या चढताना
-
मराठीतील आद्य शिलालेख। मराठी अस्तित्वाचा बळकट पुरावा
-
महामस्तकाभिषेक पूजा
-
महामस्तकाभिषेक पूजा
-
श्रवणबेळगोळ-कल्याणी तलाव
-
चावुंडराया बसदी
-
चंद्रगिरी पर्वतावरील मंदिर
-
चंद्रगिरी पर्वतावरील शिलालेख
-
चंद्रगिरी पर्वत - भद्रबाहू गुहा
-
चावुंडराया बसदी
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "श्रवणबेळगोळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "श्रवणबेळगोळ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). 2012-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-14 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "२००६ मधील महाअभिषेक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |