बेलूर
बेलूर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे यगाची नदीच्या तीरावर वसले आहे. हे नगर ऐतिहासिक काळातील होयसळ राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
चेन्नकेशवा मंदिर[संपादन]
इ.स. १११७ साली राजा विष्णुवर्धन याने हे मंदिर बांधवले [१][२]. हासन शहरापासून ४० कि.मी. आणि बंगळूर शहरापासून २२० कि.मी. अंतरावर असलेले हे मंदिर सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. द्रविड व होयसाळ स्थापत्यकलेत घडवलेले हे मंदिर, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
मंदिरातील मुख्य आकर्षण सुंदर व बारकाव्याने कोरीव काम केलेल्या मानवाकृती आहेत. मंदिरातील प्रत्येक खांब आकार आणि रचनेमध्ये वेगळा आहे. मंदिराबाहेर रामायण, महाभारत, हिंदू पुराणातील आख्यायिका कोरल्या आहेत. मंदिराच्या दाराबाहेर होयसाळ राज्याचे बोधचिन्ह आहे. चेन्नकेशवा मंदिराच्या दक्षिणेकडे कप्पे चेन्निगाराया मंदिर आहे. होयसाळांमधील शांतलादेवी नावाच्या राणीने हे मंदिर बांधून घेतले. या मंदिराच्या नैऋत्य दिशेला सौम्यनायकी मंदिर आहे.
चित्रदालन[संपादन]
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ "अबाउट चेन्नकेशवा टेंपल बेलूर (चेन्नकेशवा मंदिराविषयी)" (इंग्लिश भाषेत). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ शेट्टार,एस. "होयसाला हेरिटेज (होयसाळांचा वारसा)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on ३ ऑगस्ट २०१४. १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |