शेकरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेखरू
Malabar Giant Squirrel-Dogra.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: कृंतक
कुळ: शायिकाद्य
जातकुळी: रॅटुफा
जीव: रॅ. इंडिका
शास्त्रीय नाव
रॅटुफा इंडिका
(एर्क्सलेबन, इ.स. १७७७)
Ratufa indica range map.svg

शेकरू किंवा शेकरा(मराठी नामभेद: शेखरू ; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विअरल) ही खारींची एक प्रजात आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशु आहे.

आढळ[संपादन]

महाराष्ट्रातील आढळ[संपादन]

राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळतीच्या जंगलात माडत, किंदळ, उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतू आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्रात भीमाशंकर,फणसाड, आजोबा डोंगररांगात,माहुली ,वासोटा परीसरात शेकरू आढळतो.मेळघाट,ताडोबा येथे ही दिसते.

भीमाशंकरी जात[संपादन]

महाराष्ट्रातील भीमाशंकरी जात

शेकरू ची भीमाशंकरच्या जंगलात भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरू पेक्षा वेगळी जात सापडते. भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या च्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. त्यापैकी 'राटूफा इंडिका' (RATUFA INDICA) ही उपप्रजाती फक्त महाराष्ट्रात आढळते.

शरीररचना[संपादन]

वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असते. गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.

जीवनकाल[संपादन]

शेकरु वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर सहज झेप घेणारे शेकरु १५ ते २० फुटांची लांब उडी मारु शकते. डहाळी व पानं वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत[२].

खाद्य[संपादन]

विविध प्रकारची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते.

संकीर्ण[संपादन]

इ.स. १९९५ साली पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांचे शेकरू हे शुभंकर होते.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. साचा:IUCN2008
  2. प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स [मृत दुवा]. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.